Bidri Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Bidri Sugar Factory : बिद्री साखर कारखान्यावरून विधानसभेची ठिणगी, के.पी. पाटील, प्रकाश आबिटकरांमध्ये जुंपली

sandeep Shirguppe

Bidri Factory Kolhapur : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तत्काळ निलंबित केला. या कारवाईनंतर राधानगरी तालुक्यातील आजी माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन दिवसांपूर्वी या साखर कारखान्यातील डिस्टिलरी प्रकल्पाची अचानक चौकशी केली होती. या चौकशीअंती उत्पादन शुल्क विभागाने अनेक निष्कर्ष नोंदवून परवाना निलंबित करण्याची सोमवारी कारवाई केली. या कारवाईनंतर राधानगरी तालुक्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पहायला मिळत आहे. माजी आमदार बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर आरोप केले आहेत याला आमदार आबिटकर यांनी प्रत्यूत्तर दिले आहे.

आमदार आबिटकर म्हणाले की, के. पी. पाटील हे बिद्री कारखान्यांच्या निवडणुकीतून बाहेर आले नाहीत. त्यांना माहिती नसेल बिद्री साखर कारखाना हा काही कोणा एकाच्या मालकीचा नाही, तो सभासदांचा आहे. मी बिद्री साखर कारखान्याच्या कामगाराचा मुलगा आहे. बिद्री कारखाना ही आमची मातृसंस्था आहे, आमचं भावनिक नातं या कारखान्याशी जोडलं आहे. त्यामुळे अशा चुका करायला आम्हाला वेळ नाही, मतदारसंघातील काम करणे हे आमचे ध्येय आहे. त्यांच्यापेक्षा १० पटीने बिद्री कारखान्यासाठी पुढे राहून आम्ही काम करत आहे. कारखान्यावर कोणता छापा पडला हे देखील आम्हाला माहिती नाही, तुमच्यावर छापा टाकायला आम्हाला वेळ नाही, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले.

बिद्री साखर कारखान्याचा आधार घेऊन ते विधानसभा लढवायला निघालेत. 50 खोके, गद्दार, कलंकित आमदाराला पराभूत करूया म्हणून त्यांनी सभा घेतल्या. अचानक वर्षभरात काय झालं माहिती नाही पाटील हे नामदार हसन मुश्रीफ आणि नामदार अजितदादांच्या माध्यमातून सत्तेमध्ये सहभागी झाले. सत्तेत राहून सगळे फायदे घेतले.

आता के पी पाटील हे प्रभाकर पणशीकर यांच्या 'तो मी नव्हेच' मधील लखोबा लोखंडेची भूमिका बजावत आहेत. आम्हाला गद्दार म्हणणारे तेच, सत्तेत सहभागी होणार तेच, संजय मंडलिक यांच्या प्रचारात काम करणारे तेच आणि आता शाहू महाराज यांचा सत्कार करणारे तेच. त्यामुळे के.पी. पाटील यांनी आपली खरी भूमिका सांगावी, असे प्रकाश आबिटकर यांनी म्हटले.

के. पी. पाटील नेमकं काय म्हणाले

रात्रीच्या अंधारात ‘बिद्री’ची झालेली चौकशी केवळ राजकीय हेतूने झाली असून, हा आमदारांचा प्रताप आहे, असा थेट आरोप बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकरांवर केला.

पाटील म्हणाले, ‘तपासणी पथकाच्या तपासणीत अक्षेपार्ह सापडले नाही. बिद्रीचा कारभार पारदर्शी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या कारवाई पाठीमागे महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांचे मुदाळ गावच्या ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या स्वागतास माझी उपस्थिती व शक्तिपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात माझा सहभाग ही प्रमुख कारणे आहेत.

गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये बिद्रीची प्रगती कशी रोखता येईल, यासाठीच ते शासन दरबारी कार्यरत राहिले आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्याला सभासद होता यावे यासाठी आम्ही केलेला प्रयत्न त्यांनी न्यायप्रविष्ट केला. सहवीज प्रकल्पात अडथळे आणले. राज्यात अव्वल ठरलेल्या सहवीज प्रकल्पाच्या टॉवर लाईनला विरोध करून प्रकल्प रोखला. सुमारे १२० कोटींच्या प्रकल्पाचे व सभासदांचे कोट्यवधींचे नुकसान केले.

डिस्टलरी प्रकल्पाचे इरादापत्र व अन्य अनुषंगिक परवाने व लायसन्स कोणी अडविले, हे महाराष्ट्राला समजले. विस्तारीकरण मंजुरीच्या फायली सत्तेच्या जोरावर दोन वर्षे निर्णयाविना अडकवून ठेवल्या. टेस्ट ऑडिटसाठी संबंधित अधिकाऱ्यांवर सत्तेचा गैरवापर करून कुणी दबाव टाकला, हेही महाराष्ट्राने पाहिले.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Floriculture : शेतकरी नियोजन : फुलशेती

Narendra Modi and Rahul Gandhi : निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींसह राहुल गांधी राज्यात

Fruit Crop Insurance : आंबिया बहरातील फळपिकांसाठी विमा योजना

Flood Affected Farmer : महापूर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे, कोल्हापूर कृषी विभागाकडून याद्या अपलोडींगचे काम सुरू

Nandurbar Earthquake : नंदुरबार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

SCROLL FOR NEXT