Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop : सोयाबीन, कापूस जोमात; दमदार पावसाची गरज

Kharif Season : कृषी विभागाने शंभर मिलिमीटर पाऊस व जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पिकांचे पेरणी न करण्याचे आवाहन केले होते.

Team Agrowon

Latur / Dharashiv News : दोन्ही जिल्ह्यांमध्ये यंदा मेमध्ये पडलेल्या पावसामुळे आणि जूनमध्ये उशिराने पडलेल्या पावसामुळे पिकांची अवस्था दोन गटात विभागली गेली आहे. कृषी विभागाने शंभर मिलिमीटर पाऊस व जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय पिकांचे पेरणी न करण्याचे आवाहन केले होते. यात काही भागात चांगला पाऊस पडला तर काही भागात पावसाने ओढ दिली.

रिस्क घेऊन अनेक शेतकऱ्यांनी जूनमध्ये पेरण्या उरकल्या. ही पिके सध्या बहरात असून जुलैमध्ये पेरणी केलेली पिके सध्या वाढीच्या अवस्थेत असली तरी या पिकांपासून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची खात्री शेतकऱ्यांना नाही. सातत्याने पिकांपुरता पाऊस पडत गेल्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

लातूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यानचा सरासरी पाऊस ७०६ मिलिमीटर असून आतापर्यंत २३१ मिलिमीटर (६३ टक्के) पाऊस झाला आहे. जिल्ह्यात चार लाख ८५ हजार १८२ हेक्टर (१०९ टक्के) सोयाबीनची पेरणी झाली असून जूनमध्ये पेरणी झालेले पीक फुलोरा अवस्थेत असून ढगाळ वातावरणामुळे पाने खाणाऱ्या अळीचा प्रार्दुभाव दिसून येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी सांगितले.

जुलैमध्ये पेरलेली पिके अजून वाढीच्या अवस्थेत आहेत. यात कापसाची लागवड यंदा १४ हजार १३० हेक्टर (१५१ टक्के) झाली असून तणांमध्ये पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. खुरपणीसाठी मजुरांचा तुटवडा असून तृणनाशकांच्या फवारणीमुळे कापसाची वाढ खुंटल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात ज्वारीचे पेरा घटला असून यंदा केवळ दोन हजार ८४९ हेक्टवर (२२ टक्के) पेरणी झाली आहे. तूर, मुग व उडीदाचे पीक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असल्याचे श्री. लाडके यांनी सांगितले.धाराशिव जिल्ह्यात २९६ (८१ टक्के) पाऊस झाला असून जिल्ह्याचे हवामान ढगाळ असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.

यात जिल्ह्यात १६ महसूल मंडळात ५१ ते ७५, २२ मंडळात ७६ ते शंभर टक्के तर १९ मंडळात सरासरीच्या शंभर टक्क्याहून अधिक पाऊस झाला आहे. सातत्याने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकांची वाढ समाधानकारक आहे. पिकांमध्ये कीड नियंत्रणासाठी शेतकरी फवारणी करत आहेत. सोयाबीनची चार लाख ५६ हजार १४६ हेक्टरवर (१०८.७४ टक्के) पेरणी झालेली असून काही भागात पीक वाढीच्या तर काही भागात फुलोरा अवस्थेत आहे.

पिकात काही ठिकाणी पाने खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव असल्याचे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव असलकर यांनी सांगितले. तूर फुटवे सुटण्याच्या अवस्थेत असून वाढ समाधानकारक आहे. त्यावर कीड व रोगाच्या प्रादुर्भाव दिसून येत नाही.

मक्याचे पीक वाढीच्या व फुलोरा अवस्थेत असून पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. मुग व उडीद शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून पिकाची वाढ समाधानकारक आहे. पिकावर खोड माशी, मावा, कीड या किडीचा व भुरी या रोगाचा प्रादुर्भाव असून त्यासाठी कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करण्याचे आवाहन श्री. असलकर यांनी केले आहे.

प्रमुख पिकांची सद्यःस्थिती

लातूर जिल्हा :

सोयाबीन :

क्षेत्र: ४,८५,१८२ हे. (१०९%)

स्थिती ः जूनमध्ये पेरलेले पीक ः फुलोरा अवस्थेत

प्रादुर्भाव ः आळीचा प्रादुर्भाव (पाने खाणारी)

कापूस :

क्षेत्र : १४,१३० हे. (१५१%)

स्थिती ः तणामुळे वाढ खुंटली, खुरपणीस मजुरांची कमतरता

प्रादुर्भाव ः तणनाशकांचा विपरीत परिणाम

ज्वारी :

क्षेत्र: फक्त २,८४९ हे. (२२%)

घटलेला पेरा ः तूर, मूग, उडीद

स्थिती ः शेंगा भरण्याच्या अवस्थेत

धाराशिव जिल्हा :

Kharif Crop

सोयाबीन :

क्षेत्र : ४,५६,१४६ हे. (१०८.७४%)

स्थिती ः काही भागांत फुलोरा, काही भागांत वाढीची अवस्था

प्रादुर्भाव ः पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

तूर :

स्थिती ः फुटवे सुटत आहेत, वाढ समाधानकारक

प्रादुर्भाव ः रोग-कीड प्रादुर्भाव नाही

मका :

स्थिती ः वाढ व फुलोरा अवस्था

प्रादुर्भाव ः लष्करी अळीचा

मुग, उडीद :

स्थिती ः शेंगा लागण्याच्या अवस्थेत

प्रादुर्भाव ः खोडमाशी, मावा, भुरी रोगाचा

जूनमध्ये पेरण्या केलेली पिके सध्या चांगली असून जुलैमध्ये पेरणी केलेल्या पिकांतून अपेक्षित उत्पन्नाची खात्री नाही. अजूनही पिकांसाठी दमदार पावसाची गरज आहे.
- बालाजी शितोळे, शेतकरी, नायगाव, ता. कळंब, जि. धाराशिव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Unseasonal Rain: उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; राज्यात कोकण वगळता वादळी पावसाचा इशारा

Vidarbha Irrigation Projects: विदर्भातील ५ सिंचन प्रकल्पांची कामे भूसंपादनाअभावी प्रलंबित- गिरीश महाजन

Wheat and Chana Harvesting: खानदेशात गहू, हरभरा काढणीस वेग

Disaster Compensation: नुकसान भरपाईसाठी राष्ट्रीय आपत्तीचे निकष लावा

Education Support: ‘महाबीज’तर्फे दहा शाळांना ग्रंथसाहित्य भेट

SCROLL FOR NEXT