Kharif Crop Damage : सरासरीपेक्षा कमी पावसामुळे खरीप पिकांना ताण

Rainfall Deficit : अनेक मंडलात जुलै- ऑगस्ट महिन्यात १५ ते २० हून अधिक दिवस पावसाचा खंड आहे. उन्हाचा चटका वाढला आहे.
Kharif Crop Damage
Kharif Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४ पैकी ११ तालुक्यात यंदा जून व जुलै महिन्यात अपेक्षित पावसाच्या सरासरीहून कमी पाऊस झाला. त्यात ऑगस्ट महिन्यातील पहिला आठवडा कोरडा गेला आहे.अनेक मंडलात जुलै- ऑगस्ट महिन्यात १५ ते २० हून अधिक दिवस पावसाचा खंड आहे. उन्हाचा चटका वाढला आहे.

हलक्या जमिनीवरील पिके माना टाकत आहेत. वाढीच्या, फुलोरा अवस्थेतील पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. फुळगळ होत आहे. परिमाणी उत्पादनात मोठी घट येणार, असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

यंदा परभणी जिल्ह्यात ५ लाख १८ हजार ४६७ पैकी ४ लाख ९९ हजार १८३ हेक्टरवर (९६.२८ टक्के ) तर हिंगोली जिल्ह्यात ४ लाख १० हजार ३९८ पैकी ३ लाख ५२ हजार २६ हेक्टरवर (८७.७८ टक्के) खरिपाची पेरणी झाली.

Kharif Crop Damage
Crop In Crisis : पावसाने आठवडाभर दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त

मूग पीक शेंगा भरण्याच्या, सोयाबीन वाढ तसचे फुलोरा अवस्थेत, कपाशीचे पीक पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत आहेत. तर ज्वारी, बाजरी, तूर,उडीद ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. सोयाबीनवक चक्रीभुंगा, पाने खाणारी अळी, कपाशीवर रसशोषक कीडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

यंदा जून महिन्यात परभणी जिल्ह्यातील ९ पैकी केवळ पूर्णा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. जुलै महिन्यात परभणी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ५ तालुक्यात सरासरीहून कमी पाऊस झाला.

जून व जुलै या दोन महिन्यांत अपेक्षित सरासरी पेक्षा कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये परभणी, सेलू, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ७ तालुक्यांचा समावेश आहे. जुलै महिन्यात परभणी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ६ तालुक्यांमधील २३ मंडलामध्ये कमी पाऊस झाला.हिंगोली जिल्ह्यात यंदा जून मध्ये सर्व ५ तालुक्यात सरासरीहून कमी पाऊस झाला.

Kharif Crop Damage
Grape Crop In Crisis : पावसामुळे राज्यातील द्राक्ष पीक संकटात

जुलै महिन्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत या ३ तालुक्यात सरासरीहून कमी पाऊस झाला. जुलै महिन्यात हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव या ४ तालुक्यातील २० मंडलात सरासरीहून कमी पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव तालुक्यात जून व जुलैमधील सरासरीहून कमी पाऊस झाला.

Kharif Crop Damage
Kharif Crop DamageAgrowon
यंदा जोराचा पाऊस नाही.भुरभुर पाऊस पडत आहे.अजून झाडाखालची माती कोरडीच आहे.पेरणी झाली परंतु १५ ते २० दिवसांसून पाऊस नाही.उन्हामुळे हलक्या जमीवरील सोयाबीन माना टाकत आहे. मुगाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
विष्णू दराडे, सेलमोहा, शेषराव निरस पेडेगाव, ता. गंगाखेड.
आमच्या गावात यंदा पाऊस खूपच कमी झाला.चिमणीला पिण्या इतके देखील अजून रानात जमा झाले नाही. जून मध्ये लावलेली कपाशीची वाढ कमरेएवढी झाली असती. परंतु यंदा पावसाअभावी कपाशीचे पीक गुढघ्याच्या खालीच आहे. सोयाबीनची देखील वाढ खुंटली आहे. मुगाची फुलगळ झाली आहे. उत्पादनात ५० टक्केहून अधिक घट येणार आहे.
मोतीराम ब्याळे, आडगाव, ता. पालम, जि. परभणी.
आमच्या भागात सोयाबीन पिकाला फुलोरा अवस्थेत पावसाचा खंड पडल्यामुळे फुले कमी लागली आहेत. उन्हाळामुळे फुळगळ होत आहे. पाने खाणाऱ्या कीडीमुळे नुकसान झाले आहे.
शंकर गुट्टे, बेलूरा, ता. जि. हिंगोली.
सोयाबीन फुलोरा, शेंगा लागण्याच्या अवस्थेत मूग शेंगा भरण्याच्या तर कपाशी पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत, तूर, ज्वारी, वाढीच्या अवस्थेत आहे. सोयाबीनवर चक्रीभुंगा, पाने खाणारी अळीचा प्राद्रुर्भाव आढळून येत आहे. शिफारशीनुसार फवारणी करावी. पावसाच्या खंडामुळे उत्पादकतेवर परिणाम होणार आहे. सुविधा असेल तर कपाशीला संरक्षित पाणी द्यावे. बाष्पउत्सोर्जन कमी करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी.
डॉ.गजानन गडदे, विस्तार कृषिविद्यावेत्ता, वनामकृवि, परभणी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com