Hiware Bazar Agrowon
ॲग्रो विशेष

Hiware Bazar : ‘एमआयटी’चे विद्यार्थी हिवरे बाजारमध्ये गिरवणार शेतीचे धडे

Team Agrowon

Ahemdnagar News : पुण्यातील ‘एमआयटी’सारख्या मोठ्या संस्थेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र अलीकडचा विचार केला, तर तरुण, शिकलेले लोक माती, पाणी आणि गावखेड्यापासून दुरावत चालले आहेत. शेती-माती आवड निर्माण व्हावी आणि या नव्यापिढीने शेतीसाठी योगदान द्यावे, याबाबत धडे देण्यासाठी पुण्यातील एमआयटी आणि आदर्श गाव हिवरे बाजार यांच्यात करार होणार असल्याची माहिती आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी दिली.

पोपटराव पवार म्हणाले, की पुण्यातील एमआयटीचे राहुल कराड व विभागातील इतर अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी हिवरे बाजारला भेट दिली. त्यांना आम्ही हिवरे बाजार गावातील संपूर्ण विकास कामांची माहिती दिली.

भेटीनंतर बोलताना राहुल कराड म्हणाले, की १००० मुले एमआयटीमध्ये शिक्षण घेत असतात. त्यामध्ये शहरी मुलाबरोबरच ग्रामीण मुलेही असतात पण दिवसेंदिवस गावाशी व माती, पाणी आणि शेतीशी आज विद्यार्थी दुरावत चाललेले आहेत. म्हणून प्रत्येकाला छोटे-मोठी का होईना नोकरी पाहिजे त्याचा परिणाम आज गावात कोणी थांबायला तयार नाही. म्हणून एमआयटीमध्ये जेवढे मुले शिकतात या मुलांना गावाशी जोडायचे म्हणून आम्ही काही मुलांना गावातल्या गोर-गरीब, श्रीमंत, मध्यम सर्व कुटुंबामध्ये मुक्कामी पाठवत असतो, तसेच आता आम्ही शेती आणि मातीशी त्या मुलांची नाळ जोडली जावी म्हणून हिवरे बाजारमध्ये जे प्रयत्नपूर्वक प्रयोग केलेले आहेत ते एक दिशादर्शक असे आहेत.

आता हिवरे बाजारच्या प्रयोगाचा आणि एमआयटी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना शेती आणि मातीकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने वेगळा अभ्यासक्रम करता येईल का, हाही प्रयत्न आमचा असणार आहे. गांधीजींच्या विचारांचे रामराज्य हिवरे बाजारमध्ये साकारले आहे.

पद्मश्री पोपटराव पवार हे एक चालतीबोलती संस्था आहे. जून २०२३ मध्ये मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय विधायक संमेलनात जिथे २००० पेक्षा अधिक आमदार एकत्रित आले होते. त्यात सुद्धा पोपटरावांचा समावेश होता. या पार्श्‍वभूमीवर पुढील राष्ट्रीय विधायक संमेलनात ग्राम विकासाला एक प्रमुख मुद्दा बनविण्याचा निश्‍चय त्यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT