Ladki Bahin Yojana  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Scheme: 'लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा; २ हजार ६५२ महिला सरकारी कर्मचाऱ्यांकडून ३.५९ कोटींची रक्कम वसूल करणार

Misuse of Funds: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा घेतल्याचा प्रकार उघड झाला असून, २ हजार ६५२ महिला सरकारी कर्मचाऱ्यांकडून ३.५९ कोटी रुपयांची रक्कम परत घेण्याचे आदेश राज्य सरकार देणार आहे.

Roshan Talape

Pune News: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत काही सरकारी कर्मचाऱ्यांनी अपात्र असूनही लाभ घेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सरकारने आता या रकमेची वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु करुन या योजनेचा लाभ राज्यातील सर्व महिलांना दिला. त्यामध्ये महिलांना प्रति महिना १ हजार ५०० रुपये देण्यास सुरुवात करण्यात आली. या योजनेमुळे सरकारला पुन्हा सत्तेत येण्यास चांगलीच मदत झाली.

परंतू, लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या खूप वाढल्यामुळे सरकारवर खर्चाचा ताण वाढू लागला. त्यामुळे निवडणुकीनंतर लगेचच सरकारने काही पात्रतेचे निकष ठरवले आणि आता त्या निकषांनुसार अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींचा शोध घेण्याचे काम सुरु झाले. 

यात 'लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा काही महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतल्याच्या तक्रारीही समोर येत होत्या. शासन निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळू शकत नव्हता. तरीही त्यांनी अर्ज भरून पैसे घेतले असे वारंवार समोर येत होते. यावर योग्य ते पाऊल उचलण्यासाठी राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला हे तपासण्यासाठी मोहीम राबवली होती.

यासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाला १ लाख ६० हजार सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती दिली होती. या तपासणीत २ हजार ६५२ महिला कर्मचाऱ्यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे गेल्याचे आढळून आले. या लाभार्थ्यांनी ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ या ९ महिन्यांत प्रत्येकी १३ हजार ५०० रुपये घेतल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारी तिजोरीतून एकूण ३ कोटी ५८ लाखांची रक्कम या योजनेतून सरकारी कर्मचारी महिलांनी लाभ मिळवला आहे.

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या शासन निर्णयात आधीच स्पष्ट केले होते की सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तरीही राज्य सरकारच्या वर्ग तीन व वर्ग चारच्या महिला कर्मचाऱ्यांनी अर्ज भरून फायदा घेतला आहे. ज्या २,६५२ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा घेऊन लाभ घेतला, त्यांच्याकडून ३ कोटी ५९ लाख रुपयांची रक्कम परत घेण्यात येणार आहे. 

यासाठी सरकारकडून लवकरच सर्व विभागांना वसुलीचे आदेश दिले जाणार आहेत. तसेच या प्रकारामुळे आता आणखी कर्मचाऱ्यांची अशीच तपासणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MahaDBT Subsidy : महाडीबीटीच्या यंत्र वा अवजारांची खरेदी देयक ३० दिवसांनंतरही अपलोड करता येणार; कृषी विभागाने केली अट शिथिल

Kul Kayda: जाणून घेऊयात कूळ कायदा

Bihar Election Results 2025: बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? 'जेडीयू'नं केलेली पोस्ट डिलीट केल्यानं चर्चेला उधाण

Maharashtra Politics: शतप्रतिशत भाजप

Animal Blood Transfusion: रक्त संक्रमण करतेवेळी जनावरांची काय काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT