Ministry Employee Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farm Product : मंत्रालयातील ‘बाबूं’ना वाशीमच्या शेतमालाची भूरळ

Organic Farm Production : मंत्रालयात कार्यरत असलेल्या बाबू, अधिकाऱ्यांना वाशीम जिल्हयात उत्पादीत सेंद्रीय शेतमाल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Team Agrowon

वाशीम : मंत्रालयात कार्यरत असलेल्या बाबू, अधिकाऱ्यांना वाशीम जिल्हयात उत्पादीत सेंद्रीय शेतमाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हयातील सहा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी संत्रा, चियासीड, गहू, पेढे यासह इतर विविध फळे, खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले.

जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एम., जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा यांच्या पुढाकारातहा उपक्रम राबवण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालयाकडे या उपक्रमाबाबत पाठपुरावा केला आणि त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तीन दिवस हा शेतमाल विक्रीचा उपक्रम आता मुंबईत मंत्रालय परिसरात सुरु राहणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (ता.चार) वाशीम दौऱ्यात सेंद्रीय शेतमाल घेऊन निघालेल्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवली होती. त्यानंतर मंगळवार (ता.पाच) पासून मंत्रालय परिसरात शेतमाल विक्रीला सुरवात झाली.

जिल्हयातील शेतमालाला महानगरात राहणाऱ्या नागरिकांपर्यंत पोचवण्याचा मार्ग जिल्हा प्रशासन शोधत आहे. स्थानिक पातळीवर भाव कमी मिळतात. व्यापारी अल्प दराने माल मागतात. त्यामुळे शेतकऱ्यांनीच स्वतः मार्केटींग करीत जर आपला माल ग्राहकांपर्यंत पोचवला तर दोन पैसे अधिक मिळतील, याहेतूने जिल्हाधिकाऱ्यांनी पाऊले उचलली आहेत.

पहिल्या टप्प्यात सहा शेतकरी कंपन्यांना शेतमाल घेऊन मुंबईला पाठवले. पुढील टप्प्यात मुंबई, पुणे व इतर महानगरातील उच्चभ्रू वसाहती, कॉलनींमध्ये या शेतकऱ्यांना शेतमाल विक्री करता यावा यासाठी स्थानिक प्रशासनासोबत गाठ बांधण्याचे काम केले जाणार आहे.

शेतकऱ्यांना अधिकाधिक मोबदला मिळवून देण्याच्या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हा मार्केटींगचा नवा मार्ग शोधला जात असल्याचे आरिप शहा म्हणाले. मंत्रालय परिसरात तीन दिवस चालणाऱ्या या विक्रीला पहिल्या दिवशी विविध परवानग्या मिळाल्यावर दुपारनंतर सुरवात झाली. पुढील दोन दिवस पुर्णवेळ आता विक्री केली जाणार आहे.

वाशीम जिल्हयातून समृद्धी महामार्गाचे जाळे तयार झाल्याने शेतकऱ्यांना शेतमाल मुंबई व इतर महानगरात नेण्यासाठी मोठी सोय उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा शेतकरी आता घेऊ लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT