School
SchoolAgrowon

Teacher Recruitment : गावांतील शाळांना नवसंजीवनी

Village Schools : शिक्षक नसल्याने जिल्ह्यातील काही प्राथमिक शाळा अडचणीत आल्या आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने तत्काळ ७२१ प्राथमिक शिक्षकांची भरतीप्रक्रिया सुरू केली आहे.

Alibaug News : शिक्षक नसल्याने जिल्ह्यातील काही प्राथमिक शाळा अडचणीत आल्या आहेत. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने तत्काळ ७२१ प्राथमिक शिक्षकांची भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. सेवेत दाखल होणाऱ्या नव्या दमाच्या तरुण शिक्षकांना दुर्गम भागातील शाळा देण्यात येणार आहेत. यामुळे दुर्गम भागातील शाळांना नवसंजीवनी मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

सर्व तालुक्यांमध्ये समान शिक्षक देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा आहे; परंतु पनवेल, उरण, अलिबाग या तालुक्यात विविध कारणे दाखवून शिक्षक बदली करून घेतात. त्यामुळे शहरी भाग जास्‍त असलेल्‍या तालुक्यांमध्ये जास्त तर पोलादपूर, तळा, सुधागड या दुर्गम भाग जास्‍त असलेल्‍या तालुक्यांमध्ये शिक्षक संख्या अपुरी पडते. नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना दुर्गम तालुक्यात नियुक्त्या मिळण्याची शक्यता जास्त असून त्यांना मिळेल त्या शाळेत रुजू व्हावे लागणार आहे.

School
Village School Education : गावच्या शाळेत मिळावे जागतिक दर्जाचे शिक्षण

रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यासाठी ७२१ शिक्षक मिळणार असून पात्र उमेदवारांची यादी रायगड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली आहे. ४ ते ६ मार्चदरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. त्यानंतर अंतिम पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची निवड यादी ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली आहे.

मराठी, उर्दूसह ७२१ भरती

भरती प्रक्रियेसाठी ‘पवित्र प्रणाली’ ही अद्ययावत प्रणाली वापरली जात आहे. कागदपत्रांच्या पडताळणीत पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे.

प्राथमिक शिक्षण विभागात मराठी माध्यमासाठी ६७३ तर उर्दू माध्यमासाठी ४८ असे एकूण ७२१ शिक्षक येत्या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध होणार आहेत.

संबंधित उमेदवार पडताळणी कालावधित उपस्थित न राहिल्यास त्‍याची अनुपस्थिती राज्यस्तरावर कळवण्यात येणार आहे.

School
Digital School : ‘अग्निपंख’सह शेतकऱ्यांनी उभारली पर्वतावर शाळा

पडताळणीनंतरच पदस्थापना

पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून संबंधित उमेदवारांना पदस्थापना देण्याबाबत कार्यवाही पूर्ण करण्याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी ४ ते ५ मार्चदरम्यान मराठी माध्यम आणि ६ मार्च रोजी मराठी व उर्दू माध्यमासाठी होणार आहे. अलिबाग रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीमधील टिपणीस सभागृहात ही प्रक्रिया होणार आहे.

जिल्ह्यात शिक्षकांची मंजूर आणि रिक्त पदे

(मराठी व उर्दू माध्यम)

अलिबाग ४९२ (९५)

पेण ५७१ (१०६)

पनवेल ९६२ (१३६)

उरण २४२ (३३)

कर्जत ७९४ (१०७)

खालापूर ४२५ (८१)

सुधागड ३६२ (६७)

रोहा ५६६ (९६)

माणगाव ७०० (१०२)

महाड ७९१ (१४३)

पोलादपूर ३३३ (८५)

म्हसळा ३०७ (९४)

श्रीवर्धन २७५ (७८)

मुरुड २४३ (५४)

तळा २३६ (५५)

एकूण ७२९९ (१३३२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com