Video
Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?
राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने ४५ दिवसांपर्यंत दडी मारलेली आहेत. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जुलैमध्ये आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात काही भागांत पाऊस झाला, त्यामुळे अनेक ठिकाणी पिकं काहीही तग धरून आहेत. मात्र त्यानंतर पावसाने मोठी उघडीप दिली. त्यामुळे आता दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्यात १८ जिल्ह्यांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ, उर्वरित जिल्ह्यांमध्ये मध्यम दुष्काळ आणि काही भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सरकारने नुकसानीचा सविस्तर अहवाल मागवला आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मग राज्यात नेमकी परिस्थिती काय आहे, कोणते जिल्हे दुष्काळाच्या कक्षेत येऊ शकतात, पिकांचं किती नुकसान होण्याची शक्यता आहे आणि शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय आहे, हेच जाणून घेऊया आजच्या द अग्रोवन शो मधून....
