Pankaja Munde  Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Fire : अकोल्यातील आगीच्या नुकसानीचे पंचनामे

Minister Pankaja Munde : अकोला (ता. बदनापूर) येथील मठवाडी परिसरात गुरुवारी (ता. ११) दुपारी अचानक लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या धान्य, वैरणीचे तसेच जखमी पशूंचे पंचनामे शुक्रवारी (ता. १२) दुपारपर्यंत सुरू होते.

Team Agrowon

Jalana News : अकोला (ता. बदनापूर) येथील मठवाडी परिसरात गुरुवारी (ता. ११) दुपारी अचानक लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या धान्य, वैरणीचे तसेच जखमी पशूंचे पंचनामे शुक्रवारी (ता. १२) दुपारपर्यंत सुरू होते.

नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, असे आदेश राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री आणि जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिले होते. या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेत पालकमंत्र्यांनी या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली होती.

अकोला गावातील गट क्रमांक ४१ मधील मठवाडी परिसरात पोलवरील विजेच्या तारांचे घर्षण होऊन अचानक आग लागली होती. या आगीमुळे शेतातील गहू, हरभरा, तूर या धान्यांचे तसेच वैरण, गाडी बैल, पशू खाद्य, मोटरपंप, सिंचनाचे पाइप, शेती उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले होते.

आग लागलेल्या परिसरात असलेली काही जनावरे देखील आगीत होरपळली होती. आग लागल्याचे कळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय अग्निशामक दलाच्या गाड्या आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले होते.

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, बदनापूरच्या तहसीलदार आश्‍विनी डमरे यांच्याकडून आगीच्या घटनेची माहिती जाणून घेतली होती. आगीत होरपळलेल्या जखमी पशूंवर तातडीने उपचार करण्यास सांगून झळ पोहोचलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.

शुक्रवारी सकाळपासूनच महसूल कृषी पंचायत व महावितरणची कर्मचारी गावात दाखल होऊन पंचनामे करीत होते. दुपारपर्यंत दोन गाई, दोन वासरे व एक म्हैस आधीच होरफळल्याची माहिती पुढे आली होती. इतर नुकसानीचे पंचनामे सुरू होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT