Jalna Fodder Fire : बदनापूर तालुक्यात आगीत वैरणीसह गोठ्याला आग

Fire News : उन्हाळा लागण्याआधी शेतकरी जनावरांच्या वैरणीची सोय करून ठेवतात. अकोला येथील शेतकऱ्यांनीही गावाच्या पूर्वभागात वाडग्यात जनावरांच्या वैरणी साठवून ठेवल्या होत्या. लगतच्या गोठ्यातही जनावरे होती.
Fodder Fire
Fodder FireAgrowon
Published on
Updated on

Jalna News : तालुक्यातील अकोला येथील अनेक शेतकऱ्यांच्या वैरणीला तसेच गोठ्यांना आग लागून वैरण खाक झाल्याची घटना गुरुवारी (ता.१०) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत प्राथमिक माहितीत काही जनावरे होरपळल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

उन्हाळा लागण्याआधी शेतकरी जनावरांच्या वैरणीची सोय करून ठेवतात. अकोला येथील शेतकऱ्यांनीही गावाच्या पूर्वभागात वाडग्यात जनावरांच्या वैरणी साठवून ठेवल्या होत्या. लगतच्या गोठ्यातही जनावरे होती. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास अचानक एका वैरणीच्या वाडग्यात आग लागली.

दुपारची उन्हाची वेळ आणि तप्त उन्हात आगीने क्षणार्धात आसपासच्या वैरणीच्या वाडग्यांनाही आपल्या कवेत घेतले. साहेबराव केकण, ब्रह्मा केकण, अशोक सानप, गणेश केकण, बाबासाहेब केकण, यशवंत केकण, ज्ञानेश्वर केकण, शिवनारायण केकण, जगन्नाथ केकण, कडूबा केकण, रमेश केकण यांच्यासह इतर अनेक शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या वैरणी आगीत खाक झाल्या.

Fodder Fire
Fodder Fire News : जनावरांचा हजारो पेंड्या चारा आगीत जळाला

याशिवाय पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेली शेतीची अवजारे व इतर साहित्य संपूर्ण जळून खाक झाला. टीनचे पत्रेही जळाली. एका व्यक्तीचा किमान २००० पेंढी इतका चारा साठवून ठेवलेला होता. ज्वारीच्या चाऱ्याचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यासोबतच मका आणि बाजरी होती. याशिवाय गहू, बाजरी आणि ज्वारीचे भुसही आगीत जळून खाक झाले.

या घटनेत गणेश केकण, रमेश केकण यांची जनावरे होरपळल्याची प्राथमिक माहिती शेतकऱ्यांनी दिली. अनेक शेतकऱ्यांची वैरण खाक झाली होती, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. तीन ते साडेतीन तासांपर्यंत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

Fodder Fire
Fodder Fire : शॉर्टसर्किटमुळे तीस ट्रॉली चारा जाळून खाक

अग्निशमन दलानेही पोहचल्यानंतर आग विझवण्याचे प्रयत्न केले. आगीचे कारण मात्र कळले नव्हते. घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करत जनावरांना उपचार मिळावे म्हणून तसेच प्रशासनाचे मदतकार्य गतिमान व्हावे म्हणून प्रयत्न केले.

आपण प्रत्यक्ष पाहणी केली नुकसानग्रस्तांशी संवाद साधला. आगीत वैरण, शेती उपयोगी अवजारे, साहित्य, बैलगाड्या जळून खाक झाले. जखमी जनावरांना उपचारासाठी पशुवैद्यकांना पाचारण करण्यास सांगितले. माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असे कळले त्याची माहिती महावितरणला दिली, नुकसान खूप मोठे आहे.
- भाऊसाहेब घुगे, जिल्हाध्यक्ष, जालना (शिवसेना शिंदे गट).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com