Mango and Cashew Tree Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Cashew : आंबा, काजू बागायतदारांना १५ फेब्रुवारीपर्यंत परतावा द्या ; विमा कंपनीला पालकमंत्री नीतेश राणे यांच्या सूचना

Mango Cashew Farming : हजार ५८० बागायतदारांना १५ फेब्रुवारीपूर्वी पीकविमा परतावा देण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री नीतेश राणे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली.

Team Agrowon

हजार ५८० बागायतदारांना १५ फेब्रुवारीपूर्वी पीकविमा परतावा देण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री नीतेश राणे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. जिल्ह्यातील सहा मंडलातील आंबा, काजू बागायतदारांना अजूनही पीकविमा परतावा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.

या संदर्भात पालकमंत्री श्री. राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विमा कंपनीचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी अनिल पाटील, बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, विमा कंपनीचे सिध्देश येडवे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.राणे यांनी विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि जिल्हा कृषी विभागाकडून सहा मंडलांतील शेतकऱ्यांना अजूनही विमा परतावा का मिळाला नाही, याची माहिती जाणून घेतली.त्यानंतर अधिकाऱ्यांना तातडीने शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळाला पा
हिजे अशा सूचना केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार शेतकऱ्यांचे आहे हे सर्वांनी लक्षात घ्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही सर्व गंभीर आहोत. ज्या शेतकऱ्यांना परतावा मिळालेला नाही, त्यांना १५ फेब्रुवारीपूर्वी परतावा देण्यात यावा अशी सूचना पालकमंत्र्यांनी विमा कंपनीला दिले.

कंपनीच्या प्रतिनिधींनी देखील तत्पूर्वी ही रक्कम दिली जाईल असे सांगितले. सहा मंडलांतील ४ हजार ५८० शेतकऱ्यांना १० कोटी ६२ लाख रुपयांचा परतावा मिळायचा आहे. यातील आंबा बागायतदारांना ९ कोटी ९ लाख ९७ हजार तर १ कोटी ५२ लाख ३ हजार रुपये काजू उत्पादकांना मिळणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT