Minister aykumar gore  Agrowon
ॲग्रो विशेष

Jaykumar gore : मंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेला पाठवले नग्न फोटो; संजय राऊत यांचा आरोप

Maharashtra Politics : जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ केल्याचा आरोप उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Dhananjay Sanap

Political Allegations: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं महायुतीला मोठा धक्का बसला आहे. तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. त्यात आता ग्रामविकास आणि पंचायतरायज मंत्री जयकुमार गोरे यांच्या गंभीर आरोप करण्यात आले आहेत. जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ केल्याचा आरोप उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणारवरुन विरोधी पक्षाने सरकार जोरदार टिका केली आहे. राऊत म्हणाले, "भाजपचे मंत्री, देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके जयकुमार गोरे यांच्या बाबत हे समोर येत आहे. शिवकाळातील सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्याने छळ आणि विनयभंग केल्याचं समोर आलं आहे,. ही महिला पुढील काही दिवसात विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे." असंही राऊत म्हणाले.

वडेट्टीवार यांची टिका

कॉँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या मंत्र्यांची यादी रोज वाढ चालली आहे, अशी घणाघाती टिका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, "राज्यातील एक पैलवान मंत्री रोज व्यायाम करणारा, तो विवस्त्र फोटो महिलेला पाठवतो. हा मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील आहे. १० दिवस जेलची हवा खातो. त्या पलीकडे जाऊन १० हजारांचा दंड भरून न्यायालयात माफी मागतो. त्यानंतरही महिलेच्या मागे लागतो. विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल तर यापेक्षा लज्जास्पद महाराष्ट्राच्या इतिहासात अशा काळ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे." असं वडेट्टीवार म्हणाले.

प्रकरण कधीचं?

२०१६ साली कॉँग्रेसमध्ये असताना जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे नग्न फोटो पाठवले होते. या प्रकरणात गोरे यांच्या गुन्हा झाला. या गुन्हात गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. या गुन्हात जयकुमार गोरे यांना अटक करून दहा दिवस तुरुंगावास झाला. त्यानंतर त्यांना जामीन मिळाल्याने या प्रकरणाची चर्चा झाली नाही.

प्रकरण पुन्हा का चव्हाट्यावर आले?

गोरे यांनी नग्न फोटो पाठवल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला जानेवारी महिन्यात निनावी धमकीचं पत्र आलं. त्यामुळे पुन्हा संबंधित महिलेने मंत्री गोरे यांच्यावर आरोप केले आहेत. तसेच या महिलेने पत्र पाठवू कारवाईची मागणी केली आहे. तसेच १७ मार्चपासून विधानभवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT