Maharashtra Sugarcane Season agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2023 : माळशिरसचा लाखो टन ऊस तालुक्याबाहेर

Sugarcane Crushing : माळशिरस तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक दराच्या कारणामुळे तसेच तालुक्याबाहेरील कारखानदार ऊसतोड त्वरित करून ऊस उत्पादकांना अनेक सवलती देतात. जादा दर, त्वरित ऊसतोड, मोफत साखर, अनेक सवलती यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

Team Agrowon

Solapur News : माळशिरस तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक दराच्या कारणामुळे तसेच तालुक्याबाहेरील कारखानदार ऊसतोड त्वरित करून ऊस उत्पादकांना अनेक सवलती देतात या व इतर कारणामुळे तालुक्यातील सुमारे नऊ ते दहा लाख मेट्रिक टन ऊस तालुक्याच्या बाहेरील साखर कारखान्यांना जात आहे.

याचा विचार स्थानिक साखर कारखानदारांनी आणि लोकप्रतिनिधींनी करणे गरजेचे आहे.इतर कारखाने ठिबक संच, खते, मळी, मोलॅसिस जागेवर पोच करतात. तसेच सवलतीच्या दरात प्रतिटन एक किलो, अर्धा किलोप्रमाणे दिवाळीला साखर देतात. काही कारखानदार दहा किलो, पाच किलो साखर मोफत देतात.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच स्थानिक साखर कारखानदारांपेक्षा लगतच्या साखर कारखानदारांकडे प्रतिटन २०० ते ५०० रुपये जादा दर दिला जातो आदी कारणांमुळे माळशिरस तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक आपल्या शेतातील सुमारे नऊ ते दहा लाख टन ऊस लगतच्या तालुक्यातील साखर कारखान्यांकडे पाठवीत आहेत.

नवरात्र सुरू झाल्यापासून लगतचे काही साखर कारखानदार तालुक्यात ऊस तोडणी मजूर पाठवत आहेत. तालुक्यात ऊस तोडणी सुरू झाली आहे. माळशिरस तालुक्यालगतच्या फलटण तालुक्यातील साखरवाडी, श्रीराम, शरयू, स्वराज या साखर कारखान्यांकडे सुमारे चार ते साडेचार लाख ऊस गळितास मागील वर्षी गेला.

तसेच माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे कारखाना, लगतच्या राजेवाडी येथील सद्‌गुरू कारखान्याकडे दोन ते तीन लाख टन, गोपूज, माळेगाव, नीरा भीमा, भवानीनगर, बारामती ॲग्रोकडे माळशिरस तालुक्यातील चांगल्या प्रतीचा ऊस जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT