Milk Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Update : परराज्यांतील दूध संघांना पायघड्या

Dairy Development Minister Radhakrishna Vikhe Patil : परराज्यांतील दूध संघांनी अतिरिक्त दूध संकलन केले, तर ३५ रुपये प्रतिलिटर दूधदर देणे शक्य होईल. त्यामुळे ‘अमूल’सह परराज्यांतील दूध संघांनी २० लाख लिटर दूध संकलन करावे.

Team Agrowon

Mumbai News : परराज्यांतील दूध संघांनी अतिरिक्त दूध संकलन केले, तर ३५ रुपये प्रतिलिटर दूधदर देणे शक्य होईल. त्यामुळे ‘अमूल’सह परराज्यांतील दूध संघांनी २० लाख लिटर दूध संकलन करावे, असे आवाहन दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ‘राज्‍यातील अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी अमूल उद्योग समूहासह इतरही प्रक्रिया केंद्रांनी अतिरिक्‍त २० लाख लिटर दुधाचे संकलन करावे. या प्रक्रिया केंद्रांनी सहकार्य केल्‍यास राज्‍यातील दूध उत्‍पादकांना ३५ रुपये भाव देणे शक्‍य होईल,’ असा विश्वास मंत्री विखे यांनी व्यक्त केला.

राज्‍य सरकारने दुधाच्‍या दरासंदर्भात घेतलेला निर्णय राज्‍यात तातडीने लागू करता यावा, यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विशेष प्रयत्‍न सुरू केल्याचा पशुसंवर्धन विभागाचा दावा आहे. त्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने राज्‍यासह बाहेरच्‍या राज्यांत जाणाऱ्या दुधाला सुद्धा शासनाने लागू केलेले दर मिळावेत, यासाठी विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहात दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्रांच्‍या प्रमुखांच्‍या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीला अमूल, पंचमहाल, युनियन, कैरा युनियन, वलसाड, सुमूल आणि भरुज येथील युनियनचे प्रतिनिधी यांच्‍यासह दुग्‍ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड आणि विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

विखे म्हणाले, ‘‘उत्‍पादक शेतकऱ्यांना ३-५, ८-५ फॅटसाठी शासनाने ठरवून दिलेला ३५ रुपयांचा दर लागू करावा. दर लागू करण्‍यासाठी काही अडचणी असल्‍यास विभागाकडून सोडविण्‍यासाठी निश्चित पुढाकार घेतला जाईल.’’ सद्यःस्थितीत राज्‍यात अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न निर्माण झाल्‍याने यावर तोडगा काढण्‍यासाठी प्रक्रिया केंद्रांनी २० लाख लिटर दुधाचे संकलन करण्‍यासाठी सहकार्य करावे, त्‍यामुळे शेतकऱ्यांच्‍या दुधाचा प्रश्‍न मार्गी लागला जाईल. यामुळे होणारे आर्थिक नुकसानही टळेल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करतानाच, दुधाला हमीभाव मिळावा यासाठी राज्‍य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्‍ताव पाठविला असून, केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची आपण व्‍यक्तिगत भेट घेऊन याबाबत लवकरच धोरणात्‍मक निर्णय घेण्‍याची विनंती आपण केली असल्‍याचे विखे पाटील यांनी बैठकीत सांगितले.

राज्‍यातील दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्‍या हितासाठी सरकार अतिशय संवेदनशील असून, दुधाला जास्‍तीत जास्‍त भाव कसा देता येईल, असेच प्रयत्‍न केले जात आहेत. दूध उत्‍पादक शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नासाठी सर्व पातळीवर उपाययोजना करण्‍याचे काम सुरू असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले. सद्यःस्थितीत दुधाचा अतिरिक्त साठा दोन प्रकारचा आहे. कृत्रीम दूध आणि पावसाळ्यामुळे गायीच्या दुधात झालेली वाढ यामुळे फूग आली आहे. कृत्रीम दुधावर जोवर आळा बसत नाही तोवर हा प्रश्न सुटणार नाही.

‘पराराज्यांतील प्रक्रिया केंद्रांनाही अनुदान द्या’

ज्‍याप्रमाणे राज्‍यातील प्रक्रिया केंद्रांना दूध पावडर उत्‍पादनासाठी अनुदान दिले जाते त्याच प्रणमाणे परराज्‍यांतील प्रक्रिया केंद्रांनाही मिळावे, अशी मागणी उपस्थित प्रतिनिधींनी केल्‍यानंतर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे विखे पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT