Milk Farmer Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Production Cost : दुधाला उत्पादन खर्चावर दर द्यावा

Milk Price Issue : दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक १५ टक्के नफा इतका दर मिळाला पाहिजे, या मागणीवर आंदोलन उभारण्याचा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

Team Agrowon

Sangli News : दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक १५ टक्के नफा इतका दर मिळाला पाहिजे, या मागणीवर आंदोलन उभारण्याचा निर्णय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. आंदोलनाच्या तयारीसाठी बलवडी (ता. खानापूर) येथे रविवारी (ता. ७) बैठक आयोजित करण्यात आली आहे.

वाळलेली वैरण, हिरवा चारा, पशुखाद्य, मजुरीचा खर्च, औषधोपचार आदींवर निव्वळ खर्च सरकारी आकडेवारीनुसार ऑगस्ट २०२३ ला ९४ हजार ३०३ रुपये होता. शासकीय आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना लिटर पाठीमागे ४४.९० रुपये दर मिळणे अपेक्षित होते. पण आजही पंचवीस ते तीस रुपये मिळतात.

म्हणजे शेतकऱ्यांना लिटरपाठीमागे १७ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे आणि सरकार दूधसंस्थांना पाठीशी घालताना दिसते आहे. त्यामुळेच उत्पादन खर्च अधिक १५ टक्के नफा गृहीत धरून दूध उत्पादकांना दर देण्यात यावा, अशी भूमिका मांडण्यात आली.

दूध संघ हे दूध दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करून संघाचे उत्पन्न वाढवतात. शेतकऱ्यांना पैसे देताना केवळ दुधाची विक्री करून उत्पन्न देतात. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढी रक्कम देण्यास काहीच अडचण नाही.

दरम्यान, बलवडी येथे होणाऱ्या बैठकीमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दूध उत्पादकांसमवेत यासंदर्भात बैठका घेण्याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरली जाणार आहे. उमेश देशमुख, सतीश साखळकर, विकास मगदूम, जोतिराम जाधव, रियाज जमादार, सुहास जाधव, महादेव जाधव आदी उपस्थित होते.

सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाची दरवाढ करण्यासाठी ठोस असे धोरण आखत नाही. त्यातच खासगी दूध संस्थांकडून दरवाढ करण्यासाठी त्यांची मानसिकता दिसत नाही.
उमेश देशमुख, राज्याध्यक्ष, अखिल भारतीय किसान सभा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT