Milk Rate : दूधदराचा प्रश्‍न सोडवा : राजू शेट्टी

Raju Shetti : दुधाच्या बाजारभावाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुमचे काही खरे नाही,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.
Raju Shetti
Raju ShettiAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘शेतकऱ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करत आहे. राज्यात सत्तेवर कोणाचेही सरकार असो. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा उभारणे हे आमचे कर्तव्यच आहे. शेतकऱ्यांची मागणी दुधाला प्रतिलिटर ४० रुपये बाजारभाव मिळाला पाहिजे अशी आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती सरकारला फटका बसला आहे. दुधाच्या बाजारभावाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुमचे काही खरे नाही,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (ता. ३ ) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात श्री. शेट्टी बोलत होते. या वेळी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, वनाजी बांगर, बाबाजी खानदेशी, प्रकाश कोळेकर, रामदास बांगर, रामनाथ बांगर, भूषण आवटे, मंगेश बोराडे आदी उपस्थित होते.

Raju Shetti
Milk Rate Issue : दूध दरावरून गणोरे येथे शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण सुरू

श्री. शेट्टी म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे शेतकऱ्यांच्या शेतीमाल व दुधाच्या बाजारभावासाठी माझा संघर्ष सुरू आहे. पशुखाद्याचे वाढलेल्या दरामुळे दूध उत्पादक आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यांना सावरण्यासाठी दुधाला योग्य बाजारभाव देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. दुधाला अनुदान देताना जाचक अटी लावू नका. विधानसभेला फटका बसायची वाट पाहू नका. दुधाच्या भावाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुढाऱ्यांना यापुढे दुधाने अंघोळ घालण्याचे आंदोलन करावे लागेल. शेतीमालाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित झाले पाहिजे.’’

Raju Shetti
Milk Producer: दूधाला तात्पुरते अनुदान देणारी योजना मलमपट्टी ठरण्याची शक्यता

प्रभाकर बांगर म्हणाले, ‘‘दूध भुकटीची आयात करून दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नका. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. याचे आत्मचिंतन राज्य व केंद्र सरकारने करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी श्री. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यात लवकरच मोठे आंदोलन उभे केले जाईल.’’

संतोष पवार, तुकाराम गावडे, संतोष इंदोरे, सविता पोखरकर, दीपक पोखरकर, नवनाथ पोखरकर यांची भाषणे झाली. संदीप वाबळे यांनी सूत्रसंचालन केले.

संतोष पवार, तुकाराम गावडे, संतोष इंदोरे, सविता पोखरकर, दीपक पोखरकर, नवनाथ पोखरकर यांची भाषणे झाली. संदीप वाबळे यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com