Milk Price Issue : दूध दरप्रश्नी विधिमंडळ आवारात जोरदार निदर्शने

Legislature Premises Agitation : राज्यातील दूध उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करत दुधाला योग्य भाव द्यावा, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी गुरुवारी (ता. ४) विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.
Milk Price Agitation
Milk Price AgitationAgrowon

Mumbai News : राज्यातील दूध उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करत दुधाला योग्य भाव द्यावा, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या आमदारांनी गुरुवारी (ता. ४) विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ घेऊन ‘रामकृष्ण हरी, शेतकरी फिरतोय दारोदारी’ अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.

गेल्या वर्षभरापासून दूध भुकटी आणि बटरचे भाव पडल्याने दुधाचे दर पडले आहेत. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांना २५ रुपयांपर्यंत प्रतिलिटर भाव मिळत होता. त्यामुळे मागील वर्षी राज्य सरकारने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे यंदा या अनुदानाला मुदतवाढ दिली आहे.

Milk Price Agitation
Milk Rate : दूधदराचा प्रश्‍न सोडवा : राजू शेट्टी

तरीही राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारा भाव कमी असल्याने असंतोष आहे. केंद्र सरकारने दुधाची भुकटी आयात करण्यास मान्यता दिली आहे. तर राज्य सरकारने दूध भुकटी निर्यातीला अनुदान दिले आहे. त्यामुळे परस्परविरोधी धोरणामुळे दूध व्यवसाय क्षेत्रात संभ्रम आहे. तसेच राज्य सरकारने दिलेले अनुदान फसवे असून हक्काचा दर हवा, अशी मागणी करण्यात येत आहे. या असंतोषाला वाट विधिमंडळात करून देण्यात आली. सकाळी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधी विरोधी पक्षांचे आमदार पायऱ्यांवर जमले. त्यांनी राज्य सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार निदर्शने केली.

Milk Price Agitation
Milk Price Issue : दूधदर समस्येवर रास्त तोडगा

‘दूध भुकटी धोरण, शेतकऱ्यांचे होते मरण’, ‘अनुदानाची भीक नको, शेतकऱ्यांना द्या हक्काचे दर’, ‘अनुदानाची कशाला दाखवताय आस, भुकटी आयात करून पाडताय भाव’, ‘दुधाला नाही दर, सरकार वसूल करते शेतकऱ्यांकडून कर’ अशा विविध घोषणा लिहिलेले फलक हाती घेत शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा यासाठी महायुती सरकारला घेरले. या वेळी काही आमदारांनी दुधाची बाटली हातात घेऊन राज्य सरकारचे लक्ष्य वेधून घेण्याचा प्रयत्न केला.

या वेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, धीरज देशमुख, शिवसेनेचे अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, अशोक पवार, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे, प्रज्ञा सातव, सुमन पाटील, यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जोरदार घोषणाबाजी

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांनी ‘दुधाला योग्य भाव न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘ शेतकऱ्याला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘शेतकरी लागला दारोदारी सरकार स्वतःचे पोट भरी, दुधाला भाव तरी द्या रे, ‘शेतकरी फिरतोय दारोदारी, सरकार अदानीचे पोट भरी’ अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com