Shepherd Community Demand: राज्यात चाराटंचाई असताना परराज्यांतील मेंढ्या, शेळ्या, उंट आणि म्हशींचे कळप महाराष्ट्रात दाखल होत असल्याने स्थानिक पशुपालकांमध्ये नाराजी आहे. स्थानिक पशुधनाच्या चाऱ्यावरील ताण आणि संसर्गजन्य रोगांचा धोका लक्षात घेता परराज्यांतून कायम स्थलांतरित होणाऱ्या पशुधनाला प्रवेशबंदी करावी, अशी मागणी मेंढपाळ आणि गवळी समाजाने केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (ता. २०) चांदूरबाजार तहसीलदारांमार्फत पशुसंवर्धन आयुक्तांना निवेदन देण्यात आले..निवेदनानुसार, अमरावती, अकोला आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांत अंदाजे ३० ते ४० हजार मेंढ्या-शेळ्या आणि सुमारे १२०० उंट दाखल झाले आहेत. या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परराज्यांतील कायम स्थलांतरित पशुधनाच्या प्रवेशासह चराईवर प्रतिबंधात्मक आदेश दिले असतानाही त्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे..Kolhapur Fodder Scarcity : पशुपालकांची चिंता वाढली! कोल्हापूर जिल्ह्यात अवघ्या दोन महिन्यांत तीव्र चाराटंचाईची शक्यता.आदेशांची कठोर अंमलबजावणी करून उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. शासनाने तातडीने प्रवेशबंदीचा निर्णय न घेतल्यास पशुसंवर्धन सचिवांचे कार्यालय ताब्यात घेऊन तेथे शेळ्या-मेंढ्या, गायी-म्हशी आणि बैल बांधण्यात येतील, असा इशारा मेंढपाळ व गवळी समाजाने दिला आहे. या वेळी परिसरातील मेंढपाळ, समाजबांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते..Cactus as Fodder: कमी पाण्यात येणारा बिनकाटेरी निवडुंगाचा हिरवा चारा जनावरांसाठी फायदेशीर.सह-आयुक्तांच्या कार्यपद्धतीची चौकशी कराअमरावती विभागाचे प्रादेशिक सह-आयुक्त (पशुसंवर्धन) वंजारी यांच्या कार्यपद्धतीची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करून दोष आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे..परराज्यांतील पशुधनाला प्रवेश देण्याची वेळ आल्यास केवळ लसीकरण प्रमाणपत्रांवर अवलंबून न राहता रक्तनमुने, टायट्रेशन तपासणी आणि प्रयोगशाळेचे अधिकृत अहवाल अनिवार्य करावेत, असेही म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.