Milk Price Issue : 'लाडकी बहीण योजने'ची भीक नको, दुधाला ४० रुपये दर द्या; दूध उत्पादक महिलांची सरकारकडे मागणी

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 : राज्यभर दूध दराच्या वाढीसाठी आंदोलन केली जात आहेत. पण दूध उत्पादकांची मागणी विचारात न घेता सरकारने दुधाचे दर जाहीर केले आहेत.
Milk Price Issue
Milk Price IssueAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील दूध उत्पादकांकडून शेतकऱ्याकडून दूधाला प्रति लिटर ४० रूपये दर मिळावा यासाठी आंदोलन केले जात आहे. विविध ठिकाणी आंदोलन होत असतानाच पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत मंगळवारी (ता. २) दुधाला प्रति लिटर ३५ रूपये दर दिला जाईल, असे निवेदन केले. यात शासनाच्या ५ रूपये अनुदानाचा देखील समावेश आहे. यावरून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे समाधान झालेले नसून अहमदनगर येथे दूध उत्पादकांनी मुंडण करत आंदोलन केले. तर पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर जोरदार निशाना साधला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार येथे दूध उत्पादकांनी घोटी-कोल्हार राज्यमार्ग अडवत आंदोलन केले. तसेच सरकारच्या धोरणांचा निषेध करताना रस्त्यावर बैलगाडी आणत शेण ओतले. तर मुंडण करत दूध उत्पादकांनी सरकाचा निषेध करताना दुधाला ४० रूपये दर द्या, अशी मागणी केली आहे. यावेळी आंदोलनात शेतकरी नेते डॉ. अजित नवले सहभागी झाले होते. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दुग्ध विकास मंत्र्यांना गोठ्यातील शेण पाठवले. तर तब्बल चार तासांनंतर रास्ता रोको आंदोलन संपण्यात आले.

Milk Price Issue
Milk Price : दूध संघ गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर देणार

पुण्यातून राजू शेट्टी यांनी सरकरावर जोरदार टीका केली. तर याच कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेवरून दूध उत्पादक महिलांनी सरकारवर टीका केली आहे. यावेळी शेतकरी महिलांनी सरकारला टोला लगावताना, लाडकी बहीण योजनेची भीक नको, पण आमच्या दुधाला ४० रूपये दर द्या, अशी मागणी केली. तसेच १५०० मध्ये घर चालत का? घर चालणार का? असा सवाल केला आहे.

यावेळी राजू शेट्टी यांनी देखील सरकारवर निशाना साधला. शेट्टी म्हणाले, दुधाला ४० रुपये लिटर दर देण्याची मागणी राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची आहे. त्यासाठीच आम्ही आंदोलन करत आहोत. मात्र कोणालाच विश्वासात न घेता सरकारने दर जाहिर केले. सरकारने दूध उत्पादकांच्या मागणीची दखलही घेतली नाही. त्यामुळे आता ४० रूपये दर घेतल्याशिवाय मागे हटनार नाही असा निर्धार बोलून दाखवला.

Milk Price Issue
Nandini Milk Price Hike : अमूलनंतर आता कर्नाटक दूधसंघानं दरात केली २ रूपयांची वाढ

सरकारने दुधाला ४० रुपये भाव द्यावा. या दरासाठी सरकारने दूध संघांना निर्देश द्यावेत आणि त्यांना जे पैसे द्यायचे आहेत ते द्यावेत, असे शेट्टी यांनी बजावले आहे. तर आमच्या बहिणींना दीड हजारांची रुपयांची भीक कशासाठी? तुमच्या या भिकेची गरज नाही. बहिणीच्या भावाला सक्षम करा. भाऊ तिचा संभाळ करण्यास सक्षम असल्याचा टोला शेट्टी यांनी लगावला आहे. तसेच सोयाबीन, कांदा इतर शेतमालाचे दर खाली येण्यास सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

यादरम्यान राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना खासगी व सहकारी दूध संघ गायीच्या दुधाला ३० रुपये प्रतिलिटर दर देण्याचे निवेदन दुग्धविकासमंत्री विखे पाटील यांनी केले. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात दूध भुकटी साठा शिल्लक असल्याने प्रतिकिलो ३० रुपये निर्यात प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल, असेही विखे पाटील यांनी जाहीर केले. तर आंतरराष्ट्रीय बाजारात दुधाची भुकटी आणि लोण्याचे दर कमी झाल्याने राज्यातील दूध खरेदीवर त्याचा परिणाम झाल्याचे विखे-पाटील म्हणाले. तसेच जुलैपासून देण्यात येणारे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रति लिटर ३० रूपये आणि अनुदानाचे ५ रूपये असा ३५ रूपये दुधाला दर मिळेल असेही विखे पाटील म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com