Raju Shetti On Milk Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti On Milk Rate : राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वात नगरमध्ये जोरदार आंदोलन; ४० रू दर देण्याची मागणी

Raju Shetti Ahmednagar Milk Rate protest : गेल्या काही महिन्यापासून राज्यात दूध दरावरून दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. तर दुधाला ४० रूपये दर देण्याची मागणी केली जात आहे. याच मुद्द्यावरून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत जोरदार आंदोलन करण्यात आले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात दुधाचे दर पडले असून त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. अशी टीका स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता.२) अहमदनगरमध्ये दूध दरावरून आंदोलन करण्यात आले. यावेळी शेट्टी बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील सरकारवर निशाना साधताला. तसेच सरकारने योग्य भूमिका घेतली नसल्यानेच आज आंदोलन करण्याची वेळ दूध उत्पादकांवर आल्याचे तनपुरे म्हणाले. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह संघटनेचे शेकडो कार्यकर्ते आणि दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी दुधाला किमान ४० रूपये दर मिळावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

राज्यात घसरणाऱ्या दुधाच्या दरामुळे दूध उत्पादक शेतकरी चांगलाच आक्रमक झाला आहे. दुधाला योग्य दर द्यावा तसेच दूध अनुदान मिळावे यासाठी राज्यभर जोरदार आंदोलने केली जात आहेत. याचमुद्द्यावरून शेट्टी यांच्या नेतृत्त्वात आणि आमदार तनपुरे उत्पादकांच्या उपस्थितीत राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावर जोरदार आंदोलन करण्यात आले. राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रस्तारोको आंदोलन करताना जनावरे देखील आंदोलकांनी रस्त्यावर आनली होती. तसेच दूध रस्त्यावर ओतून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला.

यावेळी दूध उत्पादक शेतकरी दुधाच्या दरापेक्षा २ ते ३ रूपये कमी दराने दूध संघाला विकत आहे. तर होणाऱ्या तोट्याचा खड्डा कसा भरून काढायचा? असा सवाल शेट्टी यांनी सरकारला विचारला आहे. तर शेतकऱ्यांला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकारने किमान ४० रूपये दुधाला दर द्यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली. तसेच सरकारला ५ तारखेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर सरकारने या कालावधीत दुधाला किमान ४० रूपये दर द्यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

अनुदान लाल फितीत आडकले

तर राज्यातला शेतकरी अडचणी आला असताना सरकार मात्र आपली पाठ थोरटून घेण्यात गुंग असल्याचा खोचक टोला आमदार तनपुरे यांनी लगावला आहे. यावेळी तनपुरे यांनी, शेतकऱ्यांच्या पिकासह आता दुधाला भाव मिळत नाही. त्यातच जनावरांचे भाव कमी झाल्याने विकताही येत नाही. अनुदान लाल फितीत आडकले आहे. शेतकऱ्यांची कर्ज माफीची मागणीबाबत अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला. मात्र मुख्यमंत्री शिंदे आमदारांच्या निधी वाटपात व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना एकीकडे आणि सरकार वेगळीचकडे निघाल्याचा आरोप तनपुरे यांनी केला आहे.

तनपुरे यांचा विखे पाटीलांना सवाल

दरम्यान सोमवारी पार पडलेल्या दूध दराच्या बैठकीवरून देखील तनपुरे यांनी टीका केली. तनपुरे यांनी कधी बैठक झाली. आम्ही आमदार हा मुद्दा उचलत असतानाही आम्हाला का बोलावलं नाही? आम्ही काय गोट्या खेळायला गेलो होतो का? असा सवाल पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारला आहे. तर येथील एक माजी आमदार बैठकीला गेला. त्याने उभ्यानेच चर्चा केल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामुळे उभ्यानेच चर्चा आणि बैठक होते का? की फक्त निवडणुकीसाठी जाहिरातबाजी सरकारला करायची आहे असाही सवाल तनपुरे यांनी केला आहे.

यावेळी दुधाला कायम स्वरुपीची ४० रुपये दर मिळावा. शेतकर्‍यांचे कर्ज सरसकट माफ करावे. शेती कर्जा बाबत होणारी सक्तीची वसूली त्वरीत थांबवीण्याचे आदेश पारीत करावे. दुध पावडर निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, तसेच ४० टक्के निर्यात शुल्क कमी करून पावडर निर्यातीला परवानगी देण्यात यावी. दुध भेसळ व काटा मारीच्या नियंत्रणासाठी शासनाच्या अधिपत्याखाली शेतकरी प्रतिनिधीचे भरारी पथके नेमावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. तर या मागणीबाबत महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT