Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : दूध संस्थांनाही मोबदला मिळावा

Doodh Sangh : दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या दालनात राज्यातील प्रमुख दूध संघांची बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : गाय दूध अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. तरीही गावपातळीवरील दूध संस्था यातून काम करीत आहेत, अशा दूध संस्थांना प्रतिलिटर किमान पन्नास पैसे प्रोत्साहन म्हणून द्यावे’, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आज केली. दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या दालनात राज्यातील प्रमुख दूध संघांची बैठक घेतली. या वेळी ते बोलत होते.

डोंगळे म्हणाले, की शासनाने गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे. ही अनुदान प्रक्रिया राबविण्यासाठी काम करणाऱ्या प्राथमिक दूध संस्थांना यामध्ये कोणताही मोबदला मिळत नाही. त्यामुळे संस्था पातळीवर उदासीनता दिसून येत आहे. संस्थांकडून शासनाच्या नियमानुसार ज्या पद्धतीने यायला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही.

यासाठी दूध संस्थांना किमान प्रतिलिटर पन्नास पैसे दिले पाहिजेत. राज्यातील गाय दूधदराचा प्रश्‍न ऐरणीवर आल्यानंतर शासनाने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाची योजना जाहीर केली. ही योजना एक महिन्यासाठी केली आहे. ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीसाठी ती होती.

दरम्यान, शासनाने त्यामध्ये आणखीन एक महिन्याची वाढ दिलेली आहे. असे असतानाही या अनुदान योजनेचा लाभ आजपर्यंत नगण्य दूध उत्पादकांना मिळालेला आहे. दूध उत्पादकांना तातडीने अनुदान देण्यासाठी नियम/अटी शिथिल केल्या पाहिजेत.

तरच हे अनुदान थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करता येणार आहे. या वेळी दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे व आयुक्त प्रशांत मोहोड उपस्थित होते. दरम्यान, दूध संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यासाठी शासनही सकारात्मक आहे. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे डोंगळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement: ‘सीसीआय’ खरेदी केंद्रांत शेतकऱ्यांना हमालीचा भुर्दंड

Silk Cocoons: नऊ दिवसांत साडेचारशे क्विंटलवर रेशीम कोषांची आवक

Natural Farming: नैसर्गिक शेती ही शाश्वत, पर्यावरणपूरक मार्ग ठरेल

Farmers Protest Warning: ...अन्यथा पुन्हा शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती

Drone Farming: शेतकऱ्यांचा ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याकडे कल

SCROLL FOR NEXT