Gokul Milk Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Gokul Milk Kolhapur : 'ही तर गोकुळच्या अध्यक्षांची हुकूमशाही', गोकुळ अध्यक्ष व दूध संस्था पदाधिकाऱ्यांत हमरीतुमरी

Gokul Milk Arun Dongale : ‘अध्यक्षांची हुकुमशाही चालणार नाही. दूध उत्पादकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा त्यांनी दिला.

sandeep Shirguppe

Milk Organization Argument : कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) संस्थेची राधानगरी तालुक्यात संपर्क सभा ठेवण्यात आली होती. दरम्यान या सभेत भेसळयुक्त दूध संस्थेच्या चर्चेवरून चेअरमन अरूण डोंगळे व गंगापुरातील महादेवराव महाडिक दूध संस्था प्रतिनिधी, आमदार प्रकाश आबिटकर यांचे समर्थक तानाजी जाधव यांच्यात जोरदार वादावादी झाली. सभासदांनी प्रश्नांची सरबत्ती करतात गोकुळ दूध संघाच्या संचालकांना सभा गुंडाळण्याची वेळ आली.

‘गोकुळ’तर्फे आज राधानगरी येथे संपर्क सभेचे आयोजन केले होते. सभा तासभर उशिरा सुरू झाली. त्यामुळे संतप्त होऊन काही सभासद निघून गेले. त्यानंतर सभेत चार दूध संस्थांच्या भेसळयुक्त दुधावरून वादविवाद झाला. भेसळयुक्त दूध संस्थांचे संकलन तडकाफडकी बंद करण्याचा आदेश अध्यक्ष डोंगळे यांनी दिला.

त्यामुळे एकनाथ देसाई, तानाजी जाधव यांच्यासह सभासद संतापले. ‘अध्यक्षांची हुकुमशाही चालणार नाही. दूध उत्पादकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ असा इशारा त्यांनी दिला.

गंगापूर येथील महादेवराव महाडिक दूध संस्थेचे प्रतिनिधी तानाजी जाधव यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार चेअरमन डोंगळे यांची भाषा हुकूमशाहीची होती. प्रतिनिधी प्रश्न विचारताच त्यांना गप्प बसवत होते. आमच्या संस्थेचे नाव महाडिक आहे, यात आमची काय चूक? डोंगळेंची भाषा ही दादागिरीची होती. विशेष म्हणजे, जाधव यांनी आपण आमदार प्रकाश आबिटकर यांचा कट्टर समर्थक असल्याचे सांगितले.

ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक राजेंद्र मोरे, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदी उपस्थित होते. संचालक नंदकुमार ढेंगे यांनी स्वागत केले. संचालक रणजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक किसन चौगले यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT