Milk Council  sakal
ॲग्रो विशेष

Milk Council : राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मंगळवारी वावी येथे दूध परिषद

Raju Shetti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत सिन्नर तालुक्यातील वावी येथे मंगळवारी (ता. २) दुपारी चार वाजता दूध परिषद होणार आहे.

Team Agrowon

Nashik News : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत सिन्नर तालुक्यातील वावी येथे मंगळवारी (ता. २) दुपारी चार वाजता दूध परिषद होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

सोमवारी (ता. १) कृषी दिनाचे औचित्य साधून माजी खासदार शेट्टी शेतकरी कर्जमुक्ती अभियानाची सुरुवात करणार आहेत. हरितक्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मस्थळी अभिवादन करून यवतमाळ, पुसद येथून हे अभियान सुरू होणार आहे.

त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर रस्ता रोको होईल. त्यानंतर दुपारी वावी (ता. सिन्नर) येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात ते जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या परिषदेला संबोधित करतील.

दूधप्रश्नावर चर्चा

गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ४० रुपये दर मिळावा. दूध उत्पादकांना देऊ केलेल्या पाच रुपये अनुदानात वाढ करून ते सात रुपये प्रतिलिटर करावे, पशुखाद्य किमतीवर नियंत्रण आणून पशुपालकांना योग्य दरात पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे, दूध शीतकरण केंद्रांना औद्योगिक दरात वीजपुरवठा करावा, पशुधनाचा शासनाने मोफत विमा काढावा, दुग्ध व्यवसायासाठी राष्ट्रीय बँकांकडून विनातारण कर्ज मिळावे, आदी प्रमुख मागण्यांकडे ते शासनाचे लक्ष वेधणार आहेत.

स्वाभिमान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे यांची या दूध परिषदेत प्रमुख उपस्थिती असणार आहे. आत्माराम पगार, श्रीकृष्ण घुमरे, मच्छिंद्र चिने, डॉ. रवींद्र पवार, संदीप शिंदे आदी परिषदेसाठी प्रयत्नशील आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT