Earthquake Agrowon
ॲग्रो विशेष

Satara Earthquake : कोयना खोऱ्यात भूकंपाचा सौम्य धक्का; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Koyna Dam Earthquake : गेल्या आठवड्यात दिल्ली भूकंपाच्या धक्क्याने हादरली होती. त्यापाठोपाठ आता साताऱ्यातही भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. यामुळे साताऱ्यात नागरींकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या आठवड्यात २३ जानेवारीला दिल्लीसह एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसले होते. येथे ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या धक्के बसले होते. यापाठोपाठ आता साताऱ्यात भूकंपाचे धक्के रविवारी (२८ रोजी) संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जाणवले. येथील कोयना, पाटण भागात हे धक्के बसले असून हा भूकंप ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. यामुळे साताऱ्यात नागरींकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सातारा आणि परिसरात थंडीचा जोर वाढला आहे. येथे हिवाळ्यात थंडीचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक हजेरी लावतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यादरम्यान साताऱ्याच्या कोयना, पाटण भागात रविवारी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाकपासून १६ किलोमीटर अंतरावर होता. तर भूकंपाची खोली जमिनीखाली ९ किलोमीटर होती. तर हा भूकंप सौम्य धक्यांचा असल्याने सुदैवानं कोणतंही नुकसान झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कोयना धरण परिसरात रविवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास भूकंप जाणवला. जो ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. हा ५ रिश्टर स्केलच्या तीव्रतेच्या आत असल्याने सौम्य होता. त्यामुळे कोयना धरण आणि परिसराला या भूकंपाचा कोणताही धोका नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच नागरीकांनी देखील घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

वारंवार भूकंपाचे हादरे

वारंवार भूकंपाचे हादरे याच्याआधी अनेक वेळा भूकंपाचे हादरे बसले आहेत. याच्याआधी २०२३ मध्ये भूकंपाचे ७ धक्के येथे बसले होते. ८ जानेवारी २०२३ रोजी २.९ रिश्टर स्केल, त्यानंतर १ फेब्रुवारी, ६ मे, १६ ऑगस्ट, ७ सप्टेंबर आणि २९ ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरात जाणवले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT