Agrowon Sanvad Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Sanvad : हळद पीक उत्पादनात सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्त्वाचे

Turmeric Farming : हळद पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची नितांत आवश्‍यकता राहते. त्यासाठी फेरस, झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन यांच्या शिफारशीत मात्रेचा वापर करावा.

Team Agrowon

Washim News : हळद पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची नितांत आवश्‍यकता राहते. त्यासाठी फेरस, झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन यांच्या शिफारशीत मात्रेचा वापर करावा. तसेच येत्या हंगामात हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, अशी स्थिती आहे.

त्यामुळे योग्य वेळी निविष्ठांचा वापर करून नियंत्रण करावे, असा सल्ला करडा कृषी विज्ञान केंद्रातील उद्यान विद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील यांनी दिला. ‘सकाळ-ॲग्रोवन’ आणि कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील तोंडगाव येथे आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी कार्यक्रमाला सरपंच गजानन गोटे, कोरोमंडलचे विभागीय व्यवस्थापक शिवप्रकाश श्रीवास्तव, विपणन उपव्यवस्थापक निशांत पुसदेकर, कृषी विद्यावेत्ता प्रा. महेश आखरे, विक्रम कापसे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हनुमान कोंघे, ॲॅग्रोवनचे विदर्भ वितरण व्यवस्थापक दिनेश टोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. पाटील यांनी हळद पिकाचे अर्थकारण, सुक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज, हळदीची काढणी, मार्केटिंग अशा विविध पैलूंबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. या वेळी श्रीवास्तव कोरोमंडलच्या उत्पादनांची माहिती दिली.

श्री. कापसे यांनी खत व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. श्री. टोंगे यांनी ‘ॲग्रोवन’च्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. महेश आखरे यांनी सूत्रसंचालन केले. कोरोमंडलचे वैभव टाक, राहुल तोलंबिया, ॲग्रोवन वितरण प्रतिनिधी अनंता शिंदे, नागेश भालेराव यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT