Turmeric Crop Management : हळद पिकाचे खत, सिंचन व्यवस्थापन

Turmeric Farming : हळद पिकाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी २५ टन चांगले कुजलेले शेणखत, २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद, १०० किलो पालाश, ५ किलो ॲझोटोबॅक्टर आणि ५ किलो स्फुरद विरघळणारे जिवाणू खत पिकाला द्यावे.
Turmeric Farming
Turmeric FarmingAgrowon
Published on
Updated on

अंजली गहरवाल, धीरज वसुले, डॉ. एन. डी. पार्लावार

खत व्यवस्थापन

हळद पिकाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी हेक्टरी २५ टन चांगले कुजलेले शेणखत, २०० किलो नत्र, १०० किलो स्फुरद, १०० किलो पालाश, ५ किलो ॲझोटोबॅक्टर आणि ५ किलो स्फुरद विरघळणारे जिवाणू खत पिकाला द्यावे. माती परीक्षणानंतर आलेल्या मातीतील अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार शिफारशीमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य ते बदल करावेत.

यापैकी नत्राची अर्धी मात्रा बेण्यांची उगवण पूर्ण झाल्यानंतर अंदाजे ३० दिवसांनी द्यावी, तर उरलेली अर्धी मात्रा म्हणजे ६० किलो नत्र पहिल्या मात्रेनंतर ४५ दिवसांनी पिकाला द्यावी. खते बांगडी पद्धतीने द्यावे. खते दिल्यावर पाऊस नसल्यास ओलित करावे. तसेच झिंक सल्फेट व फेरस सल्फेट प्रत्येकी ५ किलो लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.

Turmeric Farming
Turmeric Farming : हळदीची वाढली उत्पादकता

सिंचनाचे व्यवस्थापन

हळद हे सर्वसाधारण ८ ते ९ महिने कालावधीचे पीक आहे. त्यामुळे ओलिताची विशेष काळजी घ्यावी. हळद पिकाची लागवडीनंतर सुरवातीला पाऊस नसल्यास पिकाला संरक्षित ओलित करावे. पाऊस चांगला असल्यास शेतात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. हिवाळ्यात दर १२ ते १५ दिवसांनी ओलित करावे. पिकाची गरज, हवामान व जमिनीचा मगदूर लक्षात घेऊनच ओलिताच्या पाळ्या ठरवाव्यात. गरजेनुसार ओलिताचा कालावधी कमी जास्त करावा. पीक काढणीअगोदर १५ दिवसाआधी पिकाला पाणी देणे बंद करावे.

तणांचे नियंत्रण : हळद हे द्विहंगामी पीक असून, पिकाच्या वाढीसाठी तणांचे नियंत्रण आवश्यक आहेत. त्याकरिता पिकामध्ये २ ते ३ वेळा निंदणी करून तण नियंत्रित ठेवावे.

Turmeric Farming
Turmeric Cultivation : हळद लागवडीचे व्यवस्थापन

आंतरमशागत

मातीची भर देणे : हळद पिकाला २.५ ते ३ महिन्यात मातीची भर देणे गरजेचे आहे. मातीची भर न दिल्यास, गड्डे उघडे पडतात. हळकुंड तयार झाल्यास ती निकृष्ट दर्जाची असतात. त्यामुळे उत्पादनात जवळजवळ १० ते १५ टक्के घट येते. म्हणून पिकाला ८० ते ९० दिवसांच्या आतच संपूर्ण कंद झाकला जाईल अशा पद्धतीने मातीची भर द्यावी. नंतर लगेचच पाणी द्यावे.

फुले काढणे : हळद पिकाला ६ ते ७ महिन्यांनी फुले येतात. फुले आल्यानंतर ८ ते १० दिवसांनी ती लगेच काढून टाकावीत, अन्यथा कमी वजनाच्या हळदीचे उत्पादन मिळते. हळदीच्या पिकाला सावली चांगली मानवते म्हणून या पिकात मिरची, भेंडी सारखी आंतरपिके घेता येतात.

हळदीची काढणी व उत्पादन

हळद या पिकास २१० ते २७० दिवस कालावधी लागतो. पिकाची पाने पिवळी पडून ५० टक्क्यांपेक्षा जास्त सुकू लागल्यावर पीक काढणीस तयार झाले असे समजावे. हळद काढणीपूर्वी १५ ते २० दिवसाआधी जमिनीच्या मगदुरानुसार पिकाला पाणी देणे बंद करावे. खोदून हळद पिकाची काढणी करावी. धारदार विळ्याने जमिनीलगत पिकाचा पाला कापून काढावा.

या पाल्याचा उपयोग नंतर हळद प्रकियेत हळद शिजविण्यासाठी होतो. तेव्हा हा पाला कापून शेतातच वाळवून ढीग लावून साठवावा. या पाल्यापासून सेंद्रीय खताची निर्मितीही करता येते. काढणी केलेले बेण्यांचे जेठे गड्डे व अंगठे गड्डे अशी विभागणी करून गोल गड्डे बेणे म्हणून व अंगठे गड्डे हळदीसाठी वापरावेत. सर्वसाधारणपणे २२० ते ३५० क्विंटल प्रति हेक्टरी ओल्या हळदीचे उत्पादन मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com