Well Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

MGNREGA : वर्षभरात रोजगार हमी योजनेतून खोदल्या ४४० विहिरी

Well Irrigation : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४४० विहिरी खोदल्या आहेत.

Team Agrowon

Solapur News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ४४० विहिरी खोदल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांना १ कोटी ९१ लाख २६ हजारांचे अनुदानही मिळाले आहे. सरकारने विहिरींच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नवीन लाभार्थींना पाच लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीर खोदाईसाठी प्रोत्साहन देत आहे. सरकारच्या अटीनुसार अर्जदार पात्र ठरल्यावर विहिरीच्या कामाच्या टप्प्यानुसार अनुदानाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातात. जिल्ह्यात ६ हजार १३४ विहिरींना मान्यता दिली आहे.

या शेतकऱ्यांना मिळतो लाभ

अनुसूचित जाती, जमाती

भटक्या जमाती, विमुक्त जाती

दारिद्य्ररेषे खालील लाभार्थी

स्त्री कर्ता असलेली कुटुंबे

विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे

जमीन सुधारणांचे लाभार्थी

इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी

सिमांत शेतकरी (२.५ एकरपर्यंत शेतजमीन)

अल्पभूधारक शेतकरी

वर्षभरात खोदलेल्या विहिरी तालुकानिहाय

अक्कलकोट २८

बार्शी १३७

करमाळा १७

माढा ३८

माळशिरस १५

मंगळवेढा ४२

मोहोळ १७

पंढरपूर ५९

सांगोला ५८

उत्तर सोलापूर १९

दक्षिण सोलापूर १०

एकूण ४४०

लाभधारकाची पात्रता

अर्जदाराकडे १ एकर शेतजमीन सलग असावी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीपासून ५०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर सिंचन विहीर खोदता येईल दोन विहिरींमध्ये १५० मीटर अंतराची अट अनुसूचित जाती, जमाती, दारिद्र्यरेषे खालील कुटुंबासाठी लागू नाही

लाभधारकाच्या सातबाऱ्यावर याआधीच विहिरीची नोंद असू नये

अर्जदार हा जॉबकार्डधारक असावा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance GR: फळपीक विम्याच्या 'आंबिया बहार'साठी १२९ कोटी निधी मंजूर, शासन निर्णय जारी

Heavy Rainfall: जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

Public Issues: सामान्य जनतेची अडवणूक खपवून घेणार नाही: आमदार सुभाष देशमुख

Maharashtra Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल

SCROLL FOR NEXT