Poultry  Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Farming : शेतीपूरक पोल्ट्री व्यवसायातील मेटकर यांचा आदर्श अनुकरणीय

Poultry : शेतीपूरक पोल्ट्री व्यवसायाची शून्यातून सुरुवात करीत कष्ट आणि मेहनतीच्या बळावर या क्षेत्रात आज मोठे भरारी घेणाऱ्या रवींद्र मेटकर यांचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

Team Agrowon

Amaravati News : शेतीपूरक पोल्ट्री व्यवसायाची शून्यातून सुरुवात करीत कष्ट आणि मेहनतीच्या बळावर या क्षेत्रात आज मोठे भरारी घेणाऱ्या रवींद्र मेटकर यांचा प्रवास इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.

अंजनगावबारी गावशिवारातील रवींद्र मेटकर यांच्या मातोश्री लेअर पोल्ट्री फार्मच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, पशुसंवर्धन उपायुक्‍त पुरुषोत्तम सोळंके यांची यावेळी उपस्थिती होती. कुटुंबाच्या आर्थिक गरजांची पुर्तता व्हावी या उद्देशाने मेटकर कुटुंबीयांनी घरुनच फार कमी पक्ष्याच्या माध्यमातून पोल्ट्री व्यवसायाची सुरवात केली.

याच व्यवसायात सातत्य राखत आज त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीचा पल्ला गाठला आहे. रोज सुमारे एक लाख अंड्यांचे उत्पादन त्यांच्या लेअर फार्मच्या माध्यमातून होते. पिकाच्या निकोप वाढीसाठी त्यांनी पंचामृत हे खास जैविक द्रावण तयार केले आहे.

त्यांच्या शिवारातील पिकावर याचा अवलंब केल्यानंतर आलेले परिणाम देखील आश्‍चर्यकारक आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गंत असलेल्या संशोधन संस्थांच्या विविध वाणांची लागवड देखील ते आपल्या प्रक्षेत्रावर करतात. त्यांच्या या प्रयोगशीलतेची दखल घेत केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावर त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.

कृषी क्षेत्रातील त्यांचा हा प्रवास अनुकरणीय असल्याचे मतही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्‍त केले. राहुल सातपुते यांनी रवींद्र मेटकर यांच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली.

पशुसंवर्धन आयुक्‍त यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्‍त केले. पंचामृत तसेच नारळ व मसालेवर्गीय विविध पिकांची लागवड, सोयाबीनला झालेली शेंगधारणा या संदर्भाने रवींद्र मेटकर यांनी माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरातील तेजी कायम; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत आजचे कांदा दर?

Narendra Modi : काँग्रेसने गरिबांना लुटले ः मोदी

Sharad Pawar : तासगाव साखर कारखान्याची दयनीय अवस्था करणाऱ्यांना जागा दाखवा; शरद पवार

Irrigation Project : सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण होणार?

Sindkhedraja Assembly Constituency : सिंदखेडराजात काका-पुतणी रिंगणात

SCROLL FOR NEXT