Milk Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Business : मेळघाटात दूध व्यवसायाला कधी मिळणार गती?

Dairy Farming : मेळघाटात चिखलदरा व धारणी तालुक्यात देशी गायी व म्हशी मोठ्या प्रमाणात आहेत. चराईसाठी जंगलसुद्धा उपलब्ध आहे. याठिकाणच्या दुधाला व खव्याला मागणीसुद्धा आहे.

Team Agrowon

Amaravati News : मेळघाटात चिखलदरा व धारणी तालुक्यात देशी गायी व म्हशी मोठ्या प्रमाणात आहेत. चराईसाठी जंगलसुद्धा उपलब्ध आहे. याठिकाणच्या दुधाला व खव्याला मागणीसुद्धा आहे. परंतु या प्रदेशातील हा ठेवा जपण्यासोबतच या व्यवसायाला गती देण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर करावयाच्या उपाययोजना संथ आहेत.

मेळघाटच्या गायी व म्हशींच्या दुधामध्ये फॅटचे प्रमाण जास्त आहे. दूध उत्पादनासाठी येथील वातावरणसुद्धा अनुकूल आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे याठिकाणी दूध उत्पादनाचे व प्रक्रिया करणारे कोणतेही मोठे उद्योग उभारण्यात आलेले नाहीत.

त्यामुळे मेळघाटातील इतक्या मोठ्या प्रमाणात असलेला दूध व्यवसाय तसेच हा व्यवसाय करणारा गवळी समाजसुद्धा दुर्लक्षित राहिला आहे. त्याला आजही विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने याठिकाणी दुधावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.

प्रक्रिया उद्योगाची गरज

मेळघाटच्या धारणी व चिखलदरा, या दोन तालुक्यांतील डोंगराळ भागात आणि दऱ्या-खोऱ्यांमध्ये गवळी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे. या समाजाचा पारंपरिक दुग्ध व्यवसाय आहे. गवळी समाजातील नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात पशुधन आहे.

या व्यवसायावरच त्यांची उपजीविका आहे. परंतु आजसुद्धा हा समाज पारंपरिक पद्धतीनेच दुग्ध व्यवसाय करीत आहे. त्यांच्या व्यवसायाला प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाली तर हा व्यवसाय अजून मोठ्या प्रमाणात वाढेल व त्यांच्या विकासात भर पडेल.

मेळघाट परिसरात शेतीपूरक दुग्ध व्यवसाय करणारे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचा व्यवसाय पशुपालन हा असून दूध उत्पादनावरच या परिसरातील बऱ्याच नागरिकांचा उदरनिर्वाह चालतो. या परिसरातील नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती मिळत नाही. त्यामुळे त्यांना ही माहिती मिळावी तसेच या भागात दुधावर आधारित मोठे प्रक्रिया उद्योग उभाराले जाणे आवश्यक आहे.
- जयंत खडके, माजी संचालक, अमरावती जिल्हा दूध उत्पादन संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Middle East War: युद्ध नको, बुद्ध हवा

Livestock Entrepreneurship Scheme: पशुधन उद्योजकता योजनेत आता वराहपालनचा समावेश

Mango Pulp Seized: भेसळयुक्त आंब्याचा गर नष्ट

Farmer Protest: आंबा पीक नुकसानभरपाईचा लाभ कोकणाप्रमाणे द्यावा

Konkan Krushi Vidyapeeth: कोकण कृषी विद्यापीठाला ‘ए’ दर्जाचे मानांकन

SCROLL FOR NEXT