Dairy Business : दूध उत्‍पादनात रायगड जिल्हा परावलंबी

Raigad Milk Crisis : एकेकाळी दूध संपन्न असलेल्या रायगड जिल्ह्यातील दूध उत्‍पादनात मोठी घट झाली आहे. जिल्‍ह्यातील २६ लाख लोकसंख्येसाठी आवश्यक दुधापैकी ९५ टक्के दूध दुसऱ्या जिल्ह्यातून मागवावे लागते.
Dairy Industry
Dairy Farming Agrowon
Published on
Updated on

Raigad News : एकेकाळी दूध संपन्न असलेल्या रायगड जिल्ह्यातील दूध उत्‍पादनात मोठी घट झाली आहे. जिल्‍ह्यातील २६ लाख लोकसंख्येसाठी आवश्यक दुधापैकी ९५ टक्के दूध दुसऱ्या जिल्ह्यातून मागवावे लागते. साधारण तीन लाख लिटर दुधाची मागणी असताना, जिल्‍ह्यात केवळ एक हजार लिटर दूध उत्पादित होत आहे.

मनुष्यबळाचा अभाव, पाण्याची व हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे दिवसेंदिवस हे कमी प्रमाण कमी होत आहे. दूध उत्पादन घटल्‍याने रायगड जिल्ह्यातील १३४ दूध संस्थांसह दोन दूध संघ दिवाळखोरीत निघाले आहेत. परिणामी जिल्ह्यातील दूधग्राहकांना जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या विविध दूध संस्थांच्या दुधावर अवलंबून राहावे लागत आहे.

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, यासाठी सहकार तत्त्वावर चालणाऱ्या दूध संस्था स्थापन करण्यात आल्या; पण त्यातीलही १३४ दूध संस्था दिवाळखोरीत गेल्या आहेत. यापैकी अलिबाग तालुक्यातील पाच, पेणमधील १०, पनवेल १९, उरण चार, कर्जत १५, खालापूर पाच, सुधागड २०, रोहा आठ, मुरूड दोन, माणगाव दहा, महाड २६, म्हसळा एक आणि पोलादपूर तालुक्यातील नऊ, तर पेण तालुक्यातील जिल्हा दूध संघ आणि पनवेल तालुक्यातील तालुका दूध संघ दिवाळखोरीत निघाला आहे. सद्यःस्थितीत २१ दूध संस्था सुरू असल्याचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

या २१ दूध संस्थापैकी पेण, पनवेल, खालापूर, माणगाव तालुक्यात प्रत्येकी एक, अलिबाग व महाड तालुक्यात प्रत्येकी दोन, कर्जत व रोहा तालुक्यात प्रत्येकी तीन, तर सुधागड तालुक्यात सात दूध संस्था असल्या, तरी जिल्ह्यात प्रत्यक्षात नऊ संस्थाच दूध संकलनाचे प्रत्यक्ष काम करीत आहेत.

Dairy Industry
Dairy Business : दुग्ध व्यवसायातून साकारला स्वप्नातील बंगला !

जिल्ह्यात दररोज तीन लाख १६ हजार २४७ लिटर दुधाची गरज असताना प्रत्यक्षात एक लाख ७४ हजार ६९८.५ दुधाचे उत्पादन होत असून, एक लाख ४१ हजार ५४८.५ लिटर दुधाची जिल्ह्याला अजून गरज आहे, मात्र सरकारने त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्‍यल्‍प आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी गायी, म्हशी पाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांकडून दूध संकलनासाठी सरकारने महाड आणि खोपोली येथे दोन सरकारी दूध योजना सुरू केल्या होत्या, मात्र ही संस्थाही बंद पडली आहे.

Dairy Industry
Dairy Business: दुग्ध व्यवसायात यशस्वी प्रयोग: चारा, खुराक आणि नियोजनावर भर

दुधाचा तुटवडा

अलिबाग २२२३६

पनवेल ९४६१८

पेण १३८०१

कर्जत २८५७

रोहा १२१२४

खालापूर १०४६३

माणगाव ६६२३

सुधागड ४२९.५

मुरूड ६५४१.५

पोलादपूर ९९०

महाड १५३८४

उरण १८०२१

तळा २३५४

श्रीवर्धन ३९३७

म्हसळा २८०४.५

दुग्ध विकास कार्यालयाचे विलीनीकरण

सध्या जिल्हा दुग्ध विकास विभागात पाच कर्मचारीच कार्यरत आहेत. दुग्ध विकासाला जिल्ह्यात कमी संधी असल्याने या विभागाचे पशुसंवर्धन विभागात विलीनीकरण केले जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने अध्यादेश काढला असून, टप्प्याटप्प्याने विलीनीकरण केले जात आहे. त्यामुळे हा दुग्ध विकास विभाग काही दिवसांनी इतिहासजमा होणार आहे. सध्या या विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आलेला आहे.

मुंबईसारखी मोठी बाजारपेठ

नवी मुंबई परिसरात दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. त्याचबरोबर मुंबईसारखी मोठी बाजारपेठ जवळच असल्याने वाहतुकीचा खर्च कमी आहे. यासाठी रायगड जिल्ह्यात दुग्ध विकासासाठी खूप चांगली संधी होती, परंतु येथील स्थानिकांचे शेतीबरोबर दुग्ध व्यवसायाकडेही दुर्लक्ष झाले. सध्या फक्त खालापूर आणि महाड येथे दोन संस्था कार्यरत आहेत. त्यांच्याही सदस्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

पाणीटंचाईचा परिणाम

दुग्ध व्यवसायासाठी हिरव्या चाऱ्याची जास्त गरज असते. जिल्ह्यातील चार महिने पाणीटंचाईचे असल्याने या कालावधीत जनावरांनाही टंचाई जाणवत असते. या काळात दुधाचे उत्पन्न कमी होत असल्याने ते शेतकऱ्यांना न परवडण्यासारखे असते. यावर मात करत काही गावातील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय कार्यरत ठेवला आहे.

जिल्ह्यात गुरांसाठी हिरवा चारा मिळेनासा झाला आहे. येथे एकेकाळी कार्यरत असलेल्‍या संस्‍था टप्प्याटप्प्यानेे बंद पडल्या. आता मोजक्याच संस्था दुधाचे संकलन करतात. मागणीच्या तुलनेत दुधाचे उत्पादन घटले आहे.
- सुदर्शन पाडावे, दुग्ध विकास अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com