Dairy Business Opportunity: दूध व्यवसायात महिलांना नेतृत्व संधी हवी: डॉ. गीता पटेल

Dr. Geeta Patel: सहकारी क्षेत्रात महिलांना नेतृत्वाची संधी देण्यात यावी,’’ अशी मागणी उदयपूर (राजस्थान) येथील कच्छेर जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्ष डॉ. गीता पटेल यांनी केली.
Milk Adulteration
Milk Adulteration Agrowon
Published on
Updated on

Gujrat News: ‘‘महिलांमध्ये कार्यक्षमतेची कुठली कमी नाही. मात्र त्यांच्या कार्यक्षमतेला चालना देण्याची आवश्यकता आहे. पुरुष पुढे आणि महिला मागे अशी स्थिती आहे. त्यामुळे सहकारी क्षेत्रात महिलांना नेतृत्वाची संधी देण्यात यावी,’’ अशी मागणी उदयपूर (राजस्थान) येथील कच्छेर जिल्हा सहकारी दूध संघाच्या अध्यक्ष डॉ. गीता पटेल यांनी केली.

‘सहकारभारती’ आयोजित नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आणंद येथील राष्ट्रीय डेअरी अधिवेशनात देशभरातील दूध उत्पादक व दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील भागधारक उपस्थित होते. या वेळी महिलांनी सहभागी होत मागण्या केल्या.

Milk Adulteration
Dairy Business : दूध उत्‍पादनात रायगड जिल्हा परावलंबी

डॉ. पटेल म्हणाल्या, की दुग्ध व्यवसायात सर्वाधिक काम महिलाच करतात. यामुळे त्यांना आत्मसन्मान आणि आर्थिक स्वावलंबत्व प्राप्त झाले आहे. मात्र त्यांना नेतृत्व करण्याची संधी देण्यात यावी. आणंद परिसरात अमूल पॅटर्नच्या दूध क्रांतीला अजयपुरा या गावातूनच सुरुवात झाली.

सहकारी दूध संघाचे नेतृत्व आज महिला करीत आहेत. १,००० सभासद असून त्यापैकी ५० महिला सक्रियपणे काम करत आहेत. महिला पशुपालकांना डेअरी आमच्यासोबत असल्याचा विश्‍वास निर्माण झाला पाहिजे, असे अजरपुरा सहकारी दूध संघाच्या अध्यक्षा गायत्री पटेल यांनी नमूद केले.

Milk Adulteration
Dairy Business : संघर्षातून साधली दुग्ध व्यवसायात प्रगती

इतर मागण्या

डेअरी हा कृषिपूरक व्यवसाय ‘कृषी’प्रमाणे वीजदराची आकारणी व्हावी, व्यावसायिक दराने नको.

दूध उत्पादनांवर जीएसटी लावला जातो तो रद्द करावा.

विविध योजनांचा लाभ देताना महिलांना प्राधान्य द्यावे.

‘कारणमीमांसा गरजेची’

‘‘अनेक जण दुग्ध व्यवसायापासून दूर जात आहेत. अनेक जण हे क्षेत्र का निवडत नाहीत, याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. ही विचार करण्याची वेळ आली आहे. दूध व्यवसायाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात दूध उत्पादनात घट होते, सोबतच उत्पादन खर्च वाढतो. उन्हाळ्यात विजेचा खर्चही वाढतो. हा व्यवसाय करताना काटकसर केली जाते; मात्र पोटाला चिमटा घेऊन हा व्यवसाय किती दिवस करायचा,’’ असा सवाल गायत्री पटेल उपस्थित केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com