Pig Farming Included in Livestock Scheme: पशुसंवर्धन विभागाच्या वतीने राबविण्यात येणारी पशुधन उद्योजकता विकास योजनेमध्ये वराहपालनाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दोन लाख ८ हजार १८७ रुपयांचा हा प्रकल्प असून पशुसंवर्धन विभागाला शेतीचा दर्जा दिल्यामुळे यासाठी चार टक्के व्याज सवलत देण्यात येणार आहे..तसेच मुरघास संयंत्र वाटप योजनेमध्ये शेतकरी समूह गटांचा समावेश करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने पशुधन विकास योजनेअंतर्गत दुधाळ जनावरे, शेळी-मेंढी गट, कुक्कुटपालन आधी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आता या प्रकल्पांमध्ये वराहपालन गट वाटप योजनेचाही समावेश करण्यात आला आहे..Animal Husbandry Scheme : ‘पशुसंवर्धन’च्या योजना आता ‘डीबीटी’द्वारे.यामध्ये गट विम्यासहित लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी प्रति वराह मादी २२ हजार ५००, तर नर वराहासाठी २५ हजार रुपये, याव्यतिरिक्त विमा, विक्रीकर, शेड, खाद्य, पाणी उपकरण आणि इतर साहित्य असा दोन लाख आठ हजार १८७ रुपयांचा प्रकल्प निश्चित करण्यात आला आहे. .Livestock Scheme GR: मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजनेचा विस्तार, मुरघास संयंत्राचा शेतकरी समूह गटांना मिळणार लाभ.या प्रकल्पांतर्गत याॅर्कशायर हॅम्प शायर, लँड्रेस इत्यादी तसेच स्थानिक हवामानाशी जुळवून घेणाऱ्या उच्च उत्पादकता असलेल्या एक ते दोन वर्षे वयोगटातील वराह खरेदी करणे बंधनकारक आहे. तसेच ते खरेदी समितीच्या उपस्थितीत करण्याची गरज आहे..मुरघास योजना शेतकरी समूह गटांसाठीही मुरघास संयंत्र वाटप योजनेद्वारे उद्योजकता विकास या योजनेमध्ये शेतकरी समूह गटाचा समावेश करण्यात आला आहे. याअंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादन कंपनी, नोंदणीकृत शेतकरी समूह गट आणि महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या समुदाय, आधारित संसाधन केंद्र तसेच उमेद अंतर्गत नोंदणीकृत प्रभाग संघांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.