Onion Traders Nashik agrowon
ॲग्रो विशेष

Onion trader Strick : कांदा लिलावांबाबत आज पुढची दिशा ठरणार ; दुपारी येवल्यात व्यापाऱ्यांची बैठक

Onion issue : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांचा संपाचा आज तिसरा दिवस आहे. काल पालकमंत्री दादा भुसे यांच्या सोबत झालेल्या बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर आज येवल्यात दुपारी व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे.

Swapnil Shinde

Nashik News : कांद्याच्या प्रश्नावर नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलाव बंदचा निर्णय घेतला. त्यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोडगा न निघाल्याने व्यापारी आपल्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, आज येवल्यात दुपारी ३ वाजता व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला. तसेच नाफेड व एनसीसीएफकडून कांदा खरेदी केला. या निर्णयाच्या विरोधात कांदा उत्पादक रस्त्यावर उतरले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला. तसेच नाफेड व एनसीसीएफकडून कांदा खरेदी केला. या निर्णयाच्या विरोधात कांदा उत्पादक रस्त्यावर उतरले आहे. त्याचवेळी नाफेड आणि एनसीसीएफने देशांतर्गत बाजारात कांद्याची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही होत आहे.

नाशिक जिल्हा कांदा असोसिएशनने बुधवारपासून बाजार समित्यांमध्ये जाऊन कांदा लिलावात भाग घेणे पुन्हा बंद केले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील १५ बाजार समिती आणि उपसमितींनी सहभाग नोंदवला. त्यामुळे कांद्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या लासलगाव, पिंपळगाव बसवंतसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा लिलाव ठप्प झाले. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला व्यापारी आणि विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, नाफेड व एनसीसीएफचे अधिकारी, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी आदी उपस्थित होते. परंतु तोडगा न निघाल्याने व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. आपल्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज दुपारी तीन वाजता व्यापाऱ्यांची बैठक येवल्यात होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT