Cotton Disease  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Disease : कपाशी रोपांची मर रोखण्यासाठी उपाय

Cotton Disease Management :सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरु आहे. त्यामुळे कापाशीची रोपे सुकून रोपांची मर झालेली दिसून येत आहे. त्यामुळे कपाशी उत्पादनात मोठी घट येऊ शकते.

Team Agrowon

Cotton Crop : सध्या बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरु आहे. त्यामुळे कापाशीची रोपे सुकून रोपांची मर झालेली दिसून येत आहे.  त्यामुळे कपाशी उत्पादनात मोठी घट येऊ शकते.

बऱ्याच ठिकाणी झालेल्या पावसानंतर कपाशीच्या शेतामधील झाडे अचानक जागेवर सुकू लागलेली आहेत. याला “आकस्मिक मर” असं म्हणतात. कपाशीच्या आकस्मिक मर मध्ये जास्त काळ पाण्याचा ताण  पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेलं असतं. अशावेळी पिकाला पाणी दिल्यास किंवा पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकतं आणि कालांतराने झाडाची पाने गळतात. पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर ३६ ते ४८ तासांत आकस्मिक मर ची लक्षणे दिसू लागतात. सुकल्यानंतर पानगळ होऊन कालांतराने झाडे मरतात त्यामुळे उत्पादनात मोठी घट येऊ शकते. कापसातील मर रोखण्यासाठी  

पिकातील जास्तीच्या पाण्याचा लवकरात लवकर निचरा करा. वापसा येताच कोळपणी आणि खुरपणी करावी. त्यानंतर  लवकरात लवकर २०० ग्रॅम युरिया + १०० ग्रॅम पांढरा पोटॅश म्हणजे ००:००:५० हे खत + २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावं. या द्रावणाची प्रत्येक झाडाला १०० मिली याप्रमाणे आळवणी करावी. किंवा  १ किलो १३:००:४५  हे खथ + २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड + २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून द्रावण तयार कराव. या द्रावणाची प्रत्येक झाडाला १०० मिली चाप्रमाणे आळवणी करावी. या द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबावी.

हे सगळे उपाय आपल्याला शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात. जेणेकरून पुढं होणारं नुकसान टाळता येत.  

-------------

माहिती आणि संशोधन  - कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

संपर्क - दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा  व्हाट्सॲप क्रमांक ८३२९४३२०९७  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT