Tur Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Rate : यवतमाळमध्ये तुरीला कमाल १२ हजार ३०० रुपये दर

Tur Market : यंदाच्या हंगामातील उच्चांक; दरवाढीचा व्यापाऱ्यांनाच फायदा

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Tur Production : यवतमाळ : शेतीमालाचे भाव कमी होत असताना तुरीच्या दराने झेप घेतली आहे. तुरीच्या दराने बारा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यवतमाळ बाजार समितीत तुरीला किमान ११ हजार ५०० ते कमाल १२ हजार ३०० रुपये दर मिळाला. यंदाच्या हंगामातील हा विक्रमी दर आहे. मात्र या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. बाजारभावातील तेजी पाहता लवकरच तूर १३ हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुरीचा हंगाम बाजारभावामुळे चर्चेत असतो. या हंगामात तूर शेतकऱ्यांना तारताना दिसत आहे. यंदा कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू आदी पिकांमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नाही. ज्या शेतकऱ्यांना उत्पन्न झाले, त्यांना भाव नसल्याने कमी दरात शेतीमाल विकावा लागला. कापसाचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, हंगाम संपला तरी कापसाच्या दरात वाढ झाली नाही. उलट कापसाचे दर खाली आले. कापूस, सोयाबीन, हरभऱ्याच्या तुलनेत तुरीला सुरुवातीपासूनच समाधानकारक दर होते. गेल्या काही दिवसांत तुरीच्या दरात अचानक तेजी आली आहे. मात्र, तूरदरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक होणार असल्याचे दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी आधीच तूर विकली आहे. खरीप पेरणीच्या तोंडावर असताना फार कमी शेतकऱ्यांकडे तूर आहे. यामुळे या दरवाढीतून शेतकऱ्यांना फारसे काही मिळणार नाही.

यवतमाळ बाजार समितीत तुरीला किमान ११ हजार ५०० ते कमाल १२ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. यंदाच्या हंगामातील हा विक्रमी दर आहे. या हंगामात तूर दहा हजार रुपये प्रतिक्विंटलच्या जवळ पोहोचली होती. तुरीचे दर वाढतील असा अंदाज अभ्यासकांनी वर्तविला होता. तो आता खरा होताना दिसत आहे. तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बाजार समितीतील तुरीचे दर (रुपये प्रतिक्विंटल)
यवतमाळ - १२३००
अमरावती - १२०५०
कारंजा - १२५००
मानोरा - १२०००
शेगाव - ११६०५
अकोला - ११९७०

शेतकऱ्यांना या हंगामात एकाही पिकाला चांगले भाव मिळाला नाही. अनेक शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघालेला नाही. कापूस, सोयाबीन या महत्त्वाच्या पिकांचे दर घसरले आहेत. आता कुठे तुरीच्या दरात तेजी आली आहे. यातून काही प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघेल.
- प्रवीण देशमुख, माजी संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Antyodaya Scheme: अहिल्यानगरमधील २७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ

Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकरी, मजुरांना तातडीने मदत द्या : बाळासाहेब थोरात

Orange Damage: मृगबहार संत्राफळांचे नुकसान

Soybean Prices: हमीदरापेक्षा भाव वाढले, उत्पादन मात्र घटले

Leopard Attack: बिबट्याचा धुमाकूळ, पंढरपुरात १३ कोकरे, करमाळ्यात ५ मेंढ्या फस्त

SCROLL FOR NEXT