Dnyaneshwar Maharaj Palkhi Agrowon
ॲग्रो विशेष

Dnyaneshwar Maharaj Palkhi: माउलींच्या पालखीचे आज प्रस्थान

Warkari Tradition: श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी नगरी सज्ज झाली आहे.

Team Agrowon

Alandi News: श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदी नगरी सज्ज झाली आहे. गुरुवारी (ता. १८) रात्री ८ वाजता माउलींचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार असून, पहिला मुक्काम आळंदी गांधीवाडा येथे होईल. राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. संपूर्ण तीर्थक्षेत्र भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे.

आळंदीला जोडणारे पुणे, मरकळ, चाकण, वडगाव या रस्त्यांवर वारकऱ्यांच्या दिंड्यांचा अखंड प्रवाह सुरू आहे. खांद्यावर पताका, गळ्यात टाळ, डोईवर तुळशी वृंदावन घेतलेले वारकरी महिला-पुरुष भक्तीच्या रंगात रंगून आळंदीत पोहोचत आहेत.

इंद्रायणी घाटही भाविकांनी फुलला आहे. माउलींच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून भक्त दर्शनाचा लाभ घेत आहेत. सर्वत्र भजन, कीर्तन आणि हरिपाठाचे स्वर घुमत असून, रस्ते आणि परिसर वारकऱ्यांनी फुलले आहेत.

माऊलींची पालखी ज्या रथातून प्रवास करते, तो रथ पूर्णपणे सज्ज झाला आहे. रथाची रंगरंगोटी, वीज, पॉलिश, डागडुजी, ट्रायल यांसह सर्व दुरुस्तीची कामे संस्थानने पूर्ण केली आहेत. पालखी सोहळ्यासाठी लागणारे सर्व साहित्यही जुळवाजुळव करण्यात आले आहे.

भाविकांच्या सोयीसाठी वडगाव चौक, माउली मंदिर, चाकण चौक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी आरोग्य बूथ उभारण्यात आले असून, येथे मोफत औषधोपचार दिले जात आहेत. सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Stock : खरीप हंगामासाठी खतांचा २०० लाख टनांहून अधिक साठा; केंद्र सरकारचा दावा

Government Employees Relief GR: १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, संप काळातील अनुपस्थिती नियमित, शासन निर्णय जारी

Mega Cluster Project: मूल तालुक्यात धान प्रक्रिया ‘मेगा क्लस्टर’ उभारण्याची मागणी

Summer Ragi Farming: राधानगरी तालुक्यात उन्हाळी प्रयोग यशस्वी

Diesel Shortage: डिझेलटंचाईने उमरखेड तालुक्यात शेती मशागतीवर परिणाम

SCROLL FOR NEXT