Pune Collector Jitendra Dudi Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Training: मास्टर ट्रेनर्सचे सक्षमीकरण करावे; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

Collector Jitendra Dudi: संबंधित पिकांसाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या मास्टर ट्रेनर्सचे सक्षमीकरण भविष्यात या पिकांच्या क्षेत्र वाढीसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: पुणे जिल्ह्यात समूह पद्धतीने (क्लस्टर) लागवड करण्याचे निश्‍चित करण्यात आलेल्या पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्यासाठी त्या त्या क्षेत्रात मोठ्या स्वरूपाचे प्रशिक्षण आयोजित करावे. संबंधित पिकांसाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या मास्टर ट्रेनर्सचे सक्षमीकरण भविष्यात या पिकांच्या क्षेत्र वाढीसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिशा कृषी उन्नतीची - २०२९ अभियान आणि ‘ॲग्री हॅकॅथॉन’ बाबत आढावा बैठकीत ते बुधवारी (ता. १७) बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक सूरज मडके, सर्व तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी, विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, की दिशा कृषी उन्नतीची-२०२९ या पंचवार्षिक अभियानात निश्‍चित केल्यानुसार फळपिके तसेच इतर पिकांच्या लागवडीचे लक्ष्यांक गाठणे गरजेचे आहे. त्यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी. प्रशिक्षणाद्वारे जनजागृती, अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घेणे, त्या त्या भागात प्रक्रिया उद्योग उभारणे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना बाजारपेठ, योग्य बाजारभाव मिळेल याची खात्री देणे आदी प्रयत्न करावेत.

इंदापूर, बारामती येथे केळी, सूर्यफूल, पुरंदर येथे अंजीर, सीताफळ, जुन्नर येथे आंबा, केळी, स्ट्रॉबेरी पिकांचे प्रशिक्षण आयोजित करावे. प्रशिक्षणासाठी गरजेप्रमाणे पाणी फाउंडेशन, कृषी विज्ञान केंद्रांचा सहभाग घ्यावा. मास्टर ट्रेनर्स हे इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणार असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकांच्या लागवडीसाठी पुढे येतील.

प्रक्रिया प्रकल्प तसेच अन्य बाबींसाठी निधी विविध योजनांच्या अभिसरणातून (कन्व्हर्जन्स) मिळण्यासाठी कृषी विभाग आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रयत्न करावेत. तसेच अतिरिक्त निधीची गरज कंपन्यांचे सामाजिक दायित्व (सीएसआर), बँकेमार्फत वित्तपुरवठा तसेच आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीतून निधी देऊन पुरविण्यात येईल.

प्रकल्पांसाठी दाखल केलेले प्रकल्पांचे कर्ज गतीने मंजूर व्हावे यासाठी बँकांसोबत बैठक लावण्यात येईल, असेही श्री. डुडी म्हणाले.जूनमध्ये झालेल्या ॲग्री हॅकॅथॉनमध्ये पुरस्कार देण्यात आलेल्या १६ नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, उपक्रम प्रत्यक्षात निर्मिती होऊन बाजारपेठेत विक्रीला येण्याच्या दृष्टीने आर्थिक मदत पुरविण्यासाठी बाँबे चेंबर ऑफ कॉमर्स आदी संस्थांनी पुढाकार घ्यावा.

तसेच या स्टार्टअपला आयमॅटसारख्या संस्थांनी तांत्रिक, व्यावसायिक मार्गदर्शनासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. हॅकॅथॉनमध्ये प्रदर्शित करण्यात आलेले तंत्रज्ञान कशा प्रकारे शेतापर्यंत जात आहे, त्याचेही संनियंत्रण करावे. पुढील हॅकॅथॉनची तयारी नियोजित वेळेत होईल. तसेच त्यात अधिक अचूकता, नवीन बाबी कशा घेता येतील या अनुषंगानेही सूचना कराव्यात आदी सूचना श्री. डुडी यांनी दिल्या.

जगात अनेक देशांत कृषी प्रदर्शने आयोजित केले जातात. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपली दालने लावावीत. तसेच आपल्या कृषी आधारित उत्पादनांना नवीन बाजारपेठा शोधाव्यात.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासात वाशीम जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी ः भरणे

E-Peek Pahani : ऑनलाइन ई-पीक नोंदणीत वाढल्या तांत्रिक अडचणी; शेतकरी झाले हतबल

Marathwada Kharif Sowing : मराठवाड्यातील केवळ चार तालुक्यात अपेक्षेच्या पुढे जाऊन पेरणी

Carrot Grass Control: गाजर गवताच्या निर्मूलनासाठी सामुदायिक प्रयत्नाची आवश्यकता

Rural Marriage Problems: ग्रामीण भागातील लैंगिक कोंडमारा

SCROLL FOR NEXT