Electricity Bill Recovery Agrowon
ॲग्रो विशेष

Power Supply Disconnect : एकावन्न हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Electricity Bill Due : प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे ३१० कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी आहे.

Team Agrowon

Pune News : प्रादेशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे ३१० कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. गेल्या ३५ दिवसांच्या कालावधीत ५१ हजार ७३५ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

थकित वीजबिलांपोटी वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी महावितरणचे सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या‘ऑन फिल्ड’ आहेत. पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंते सर्वश्री राजेंद्र पवार, स्वप्नील काटकर (कोल्हापूर) व धर्मराज पेठकर (बारामती) उपविभाग व शाखा कार्यालयांना भेटी देऊन थकबाकी वसुलीचा आढावा घेत आहेत.

वीजबिल थकित असेल तर नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

ऑनलाइन पद्धतीने भरा थकबाकी

वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही ऑनलाइनद्वारे थकित व चालू वीजबिल भरण्याची सोय www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच महावितरणच्या मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध आहे. याबरोबरच ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघूदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

थकबाकीविरोधात कारवाई सुरू

महावितरणच्या महसुलाचा आर्थिक स्रोत प्रामुख्याने वीजबिलांची वसुली हाच आहे. मात्र वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने थकबाकी वाढत आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांच्या तपासणीचे काम स्वतंत्र पथकांद्वारे सुरू आहे. यामध्ये शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून थकबाकीदार विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे.

पुणे प्रादेशिक विभागात ग्राहकांकडे असलेली थकबाकीची रक्कम

जिल्हा ग्रारकांची संख्या थकबाकी रक्कम

पुणे ४२,०७३ १९९ कोटी ९९ लाख रुपये

सातारा १९२० २० कोटी ४० लाख रुपये

सोलापूर ४२७९ ४४ कोटी ७ लाख रुपये

कोल्हापूर १४९० २० कोटी ८० लाख रुपये

सांगली १९७३ २४ कोटी ९५ लाख रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT