APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Secc : पुणे बाजार समितीत सेस चोरीचे रॅकेट

Pune APMC : बाजार समितीच्या फळविभागात सध्या परदेशी फळांबरोबरच देशांतर्गत विविध फळांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

गणेश कोरे

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजार शुल्क (सेस) चोरीचे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. प्रवेशद्वारावरील आवक आणि गाळ्यावरील आवक यात तफावत असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र या प्रकरणी संबंधित अडत्यांना केवळ समज देऊन सोडून देण्यात आले आहे.

बाजार समितीच्या फळविभागात सध्या परदेशी फळांबरोबरच देशांतर्गत विविध फळांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामध्ये सफरचंद, चेरी, प्लम, अवाकॅडो, संत्रा, ड्रॅगन फ्रूट, द्राक्ष, लिची आदी फळांचा समावेश आहे. या फळांची आवक झाल्यावर वाहनांची आणि वजनाची नोंद प्रवेशद्वार होते.

मात्र प्रत्यक्ष झालेली आवक आणि तोलणारांची नोंद यांच्यात तफावत जाणवत असल्याने बाजार समिती प्रशासनाने सुरक्षारक्षकांद्वारे प्रवेशद्वारावर झालेली नोंद आणि प्रत्यक्ष गाळ्यावर झालेली नोंद यांची माहिती संकलन आणि पडताळणी करण्यासाठी कार्यप्रणाली सुरू केली. या कार्यप्रणालीमध्ये २ ते १० टनांपर्यंत तफावत असल्याचे माहिती संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले. यामुळे सेस चोरी होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

दरम्यान, गेल्या महिनाभरापासून ही पडताळणी सुरू असल्याचे फळविभाग प्रमुख प्रशांत गोते यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘बाजार समितीचे उत्पन्न वाढीसाठी सेस गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी फळ विभागात होणारी आवक आणि प्रत्यक्ष गाळ्यावर होणारी नोंद याची माहिती संकलन सुरू आहे.

यामध्ये काही अडते संशयास्पद सापडले आहेत. त्यांना समज देऊन, त्यांच्या आवकेची पडताळणी सुरू आहे. पडताळणी झाल्यावर दोषी आढळल्यास संबधितांना नोटिसा देऊन, खुलासा मागविला जाणार आहे. समाधानकारक खुलासा न आल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.’’

एकाच्या नावावर गाडी, विक्री दुसऱ्याच्या नावावर

सेस चोरी करण्यासाठी काही अडत्यांनी दुसऱ्याच्या नावावर फळांची आवक मागविली आणि विक्री तिसऱ्याच्या गाळ्यावर केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र याबाबत ज्याच्या गाळयावर विक्री झाली त्याला काहीच माहिती नसल्याचे देखील समोर आल्याने सेस चोरीचा सावळागोंधळ सुरू असल्याचे समजते.

बाजार समितीमधील शेतीमाल आवक तफावत शोधण्यासाठी दोन सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे. गेटवरील आवक नोंद आणि गाळ्यावरील आवक नोंद याची पडताळणी सुरू आहे. या पडताळणीमध्ये काही संशयास्पद नोंदी आढळल्या आहेत. त्याची पडताळणी करून संबंधित आडत्यांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. तसेच आवक नोंदीची जबाबदारी ही तोलणारांचीही आहे. यामध्ये तोलणारांनी घेतलेल्या आवकेची देखील पडताळणी करण्यात येणार आहे. यात संबंधित तोलणार दोष आढळून आल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.
- डॉ. आर. एस. धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : मूग, उडीद, तुरीच्या पेरण क्षेत्रात घट

Costal Safety : काशीदला ‘बंधाऱ्या’चे सुरक्षा कवच

Pune Dams: पुणे जिल्ह्यातील धरणांत ८० टक्के पाणीसाठा

Dhamani Dam : धामणी धरणात सव्वा टीएमसी पाणीसाठा

Loan Waiver Promise: अजितदादांच्या सासुरवाडीतूनच कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT