Chandur Bazar APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Chandur Bazar APMC: एका युक्‍तीने बाजार समितीने गाठला कोटीच्या उत्पन्नाचा टप्पा

Lucky Draw Scheme: चांदूर बाजार बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सहभागासाठी ‘लकी ड्रॉ’सारखी कल्पक योजना राबवली. यामुळे समितीने ५० वर्षांत प्रथमच १.२० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा गाठला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News: खेडा खरेदीच्या माध्यमातून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या लुटीवर नियंत्रण मिळविण्याबरोबरच त्यांना बाजारपेठेचा श्‍वाश्‍वत पर्याय उपलब्ध करून देण्याकरिता चांदूर बाजार बाजार समितीने ‘लकी ड्रॉ’ची अभिनव संकल्पना मांडली. या युक्‍तीतून बाजार समितीने गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदा एक कोटी २० लाख रुपयांच्या उत्पन्नाचा टप्पा गाठला.

मेळघाटातील आदिवासींसाठी शेतीमाल विक्रीचा अचलपूर बाजार समिती ही पर्याय होती. याच बाजार समितीअंतर्गत ५० वर्षांपूर्वी चांदूर बाजार समितीचा देखील समावेश होता. परंतु दोन तालुक्‍यांचा कारभार आणि कार्यक्षेत्राचा वाढता विस्तार, त्यातून शेतकऱ्यांची होणारी ओढाताण यामुळे प्रशासकीय स्तरावर अचलपूर बाजार समितीच्या विभाजनाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सुमारे ५० वर्षांपूर्वी स्वतंत्र चांदूर बाजार बाजार समिती अस्तित्वात आली.

सध्या ही बाजार समिती सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरी करीत आहे. या बाजार समितीच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत संत्रा फळपीक होते. या पिकातून बाजार समितीला वर्षाकाठी सव्वा तीन कोटी रुपये मिळत. परंतु सरकारने फळपिके नियमनमुक्‍त केली आणि बाजार समितीच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम झाला. भुसार मालाची खेडा खरेदी होत असल्याने त्याचाही परिणाम उत्पन्नावर दिसून येत होता.

यावर उपाय म्हणून बाजार समिती सभापती सतीश मोहोड व संचालक मंडळाच्या कल्पकतेतून बक्षीस योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत बाजारात विक्रीसाठी कमीत कमी पाच क्‍विंटल धान्य आणणाऱ्या शेतकऱ्यांना कुपन देण्यात आले. त्याच्या सोडतीत ट्रॅक्‍टर, होंडा शाईन, तुषार सिंचन संच, आटा चक्‍की, ताडपत्री, पॉवर स्प्रे अशी १११ बक्षिसे ठेवली आहेत.

एकूण दहा लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. शनिवारी (ता. २४) सकाळी दहा वाजता सोडत काढत शेतकऱ्यांना बक्षीस वितरण केले जाईल. या उपक्रमातून बाजार समितीच्या उत्पन्नातही वाढ होत ते दरवर्षीच्या ६० लाख रुपयांवरून १ कोटी २० लाख रुपयांवर पोहोचले आहे.

सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, शिवभोजन, धान्य प्रतवारीकरिता ग्रेडिंग मशिन अशा सुविधा आहेत. येत्या काळात मका लिलावासाठी खुले बाजार ओटे, भाजीपाला शेड, विजेवरील खर्च कमी करण्यासाठी सौर यंत्रणा बसविण्याचे प्रस्तावित आहे. या सर्व उपक्रमांमुळे पणन मंडळाच्या उत्पन्नशील बाजार समित्यांच्या क्रमवारीत महाराष्ट्रात पाचवा, अमरावती जिल्ह्यात पहिला तर विभागातून दुसरा क्रमांक चांदूर बाजारने पटकाविला आहे.

- सतीश मोहोड, सभापती, बाजार समिती चांदूर बाजार, अमरावती

९१३०६०६९५९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT