Water Issue
Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Issue : मराठवाडा पाणी परिषदेने मागितली ‘एमडब्ल्यूआरआरए’ कडे दाद

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी नाशिक, नगर भागातून होत असलेला विरोध पाहता मराठवाडा पाणी परिषदेने ही आक्रमकता वाढवली आहे. यासंदर्भात थेट एमडब्ल्यूआरआरए (महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण)कडे दाद मागितली आहे.

शिवाय पाणी सोडण्यास विरोध करून एक प्रकारे उच्च न्यायालयाच्या आदेशाचाच अवमान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबत दाद मागत उच्च न्यायालयात जाण्याची तयारीही चालविली आहे.

याप्रकरणी मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे म्हणाले, पाण्याला होत असलेला विरोध पाहता मराठवाडा पाणी परिषदेचे मार्गदर्शक व समविचारी व्यक्तींची चर्चा झाली. यामध्ये हक्काच्या समन्यायी पाण्यासाठी चर्चा झाली. जायकवाडीत पाणी सोडा अन्यथा मराठवाडा पाणी परिषदेतर्फे रस्त्यावरचे तीव्र आंदोलन करू असे ठरले.

पाणी सोडण्यासंदर्भात ३० ऑक्टोबरला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले. ते आदेश काढून सुद्धा आजतागायत नगर, नाशिक विभागांतील राजकीय दबावामुळे पाणी सोडण्यात आले नाही.

२३ सप्टेंबर २०१६ रोजीचे उच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन न करणे हा न्यायालयाचा अवमान आहे. मराठवाड्यातील जनतेच्या वतीने या बाबत मराठवाडा पाणी परिषदेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे कलम २६ चे उल्लंघन झाल्याबाबत दाद मागितलेली आहे. याशिवाय उच्च न्यायालयातही जाण्याची तयारी केलेली आहे.

अन्यथा दुसरे मोठे आंदोलन ः शिवपुरे

सद्यःस्थितीत गोदावरी पात्रात तुलनेने ओलावा असल्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होईल व पाणी जास्त प्रमाणात प्रकल्पात पोहोचून याचा फायदा शेतकऱ्यांना रब्बी पिकाला होईल. मराठवाडा पाणी परिषदेने आजतागायत लाक्षणिक उपोषण, निवेदनाद्वारे शांततेच्या मार्गाने आंदोलन केलेली आहेत.

परंतु बहुतेक शासनाला ही भाषा समजत नसावी. पाण्याअभावी शेती परवडत नाही हेच मराठवाड्यातील मराठा आंदोलनाचे मूळ आहे. पाणी त्वरित न सोडल्यास मराठा आंदोलनानंतरचे दुसरे मोठे आंदोलन मराठवाड्यात हक्काच्या व शेतीसाठी गरजेच्या पाण्यासाठी उभे राहील व यास प्रशासन शासन जबाबदार राहील, असा इशाराही श्री. शिवपुरे यांनी मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nilesh Lanke News : खा. निलेश लंकेंचं जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन; शेतकऱ्यांना आवाहन

Galmukt Dharan Yojana : ‘गाळमुक्त धरण’ची कामे ऑगस्टअखेर पूर्ण करा

Agricultural Pump Theft : कळवणमध्ये कृषिपंप चोरट्यांचा धुमाकूळ

Shetkari Samman Nidhi : नगरला ‘शेतकरी सन्मानच्या' कामावर ‘कृषी’चा बहिष्कार

Soybean Worm Infestation : सोयाबीनवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT