Jaykawadi Water Stock : जायकवाडीत पाणी सोडण्याच्या निर्णयानंतर आता पेचप्रसंग

Water Crisis : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतून ८.५ टीएमसी पाणी ‘जायकवाडी’ला सोडण्याचे आदेश सोमवारी (३० ऑक्टोबर) प्राप्त झाले.
Water Stock
Water StockAgrowon

Nashik News : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतून ८.५ टीएमसी पाणी ‘जायकवाडी’ला सोडण्याचे आदेश सोमवारी (३० ऑक्टोबर) प्राप्त झाले. त्यानुसार पुढील प्रशासकीय सोपस्कार पार पाडत प्रशासनाने पाणी सोडण्याची संपूर्ण तयारी केली आहे; पण अगोदरच मराठा आरक्षणामुळे वातावरण तापले आहे. त्यात जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे.

पाणी नसल्याने शेतकरी चिंतेत असल्याने विरोध आहे. त्यातच सत्ताधारी भाजप लोकप्रतिनिधी व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पाणी सोडण्याच्या निर्णयास विरोध केला आहे. त्यामुळे मराठवाडा विरुद्ध नाशिक, अहमदनगर असा संघर्ष उभा राहू शकतो. अशा परिस्थितीत निर्णय घेतला, तर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभाग पेचात पडल्याची स्थिती आहे.

Water Stock
Marathwada Water Issue : जायकवाडीत सोडणार ८.६० टीएमसी पाणी

एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान उठले आहे. अशा परिस्थितीत जायकवाडीला पाणी देण्याचा मुद्दा तापत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील काही स्थानिक नेत्यांनी पाणी सोडू नये या बाबत जिल्हा प्रशासनाला तोंडी सांगितल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभाग या कार्यवाहीच्या पार्श्‍वभूमीवर आता बुचकाळ्यात पडला आहे.

Water Stock
Marathwada Water Crisis : पाणीसाठे वाढवीत आहेत चिंता; ३६ लघू, मध्यम प्रकल्प कोरडे

भाजप महिला जिल्हा मोर्चाच्या अध्यक्षा अमृता पवार यांनी नांदूरमध्यमेश्‍वर धरण परिसरात शेतकऱ्यांना सोबत घेऊन जायकवाडीला पाणी सोडल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा घेऊन आंदोलन केले होते.

तर नाशिकच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी, तर थेट उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत नाशिक-अहमदनगरच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयावर स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे हा मुद्दा अजून तापण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाणी सोडण्याबाबत सध्या क्षेत्रीय पातळीवर तयारी सुरू आहे. अडीचशे किलोमीटर दूर अंतर असल्याने सर्व यंत्रणा सज्ज होणे गरजेचे आहे. त्यानुसार पाण्याचा उपसा टाळण्यासाठी वीजप्रवाह खंडित करणे व तर काही ठिकाणी पोलिस यंत्रणा आवश्यक आहे. त्यामुळे एक, दोन दिवस इकडे तिकडे होईल; मात्र पाणी सोडण्याची ही कार्यवाही केली जाणार आहे.
- प्रकाश मिसाळ, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, उत्तर महाराष्ट्र प्रदेश, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com