Manoj Jarange Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक; राज्य सरकारवर घणाघाती टीका

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची लढाई आता अधिक तीव्र झाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता निर्वानीचा इशारा देत मराठा आरक्षणासाठी आरपारची तयारी ठेवली आहे. ते मराठा आरक्षणासाठी मुंबईत जात असून २६ जानेवारीपासून तेथे आमरण उपोषण करणार आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत २६ जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. त्यासाठी ते मुंबईकडे निघणार आहेत. त्याआधी त्यांनी शनिवारी (ता. २० रोजी) अंतरवलीतून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, सरकारवर जोरदार टीका करताना, मराठ्यांना आता घरी न राहता २६ जानेवारी रोजीला मुंबईत पुर्ण ताकदीनीशी या असे आवाहन केले आहे.

यावेळी मनोज जरांगे यांनी, मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक स्थितीत आल्याचे सांगताना, आरक्षण हे मिळालेच पाहिजे, आता मागे हटायचं नाही असे म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार निशाना साधताना, अनेक माऊलींच्या कपाळावर कुंकू राहिलं नाही. हे फक्त या निर्दयी सरकारमुळे झाल्याची टीका त्यांनी केली आहे.

तसेच आता या सरकारला नीट केल्याशिवाय मराठ्यांना शांत बसून चालणार नाही. गेल्या ७ महिन्यापासून समाजाने सरकारला वेळ दिला. मात्र सरकार समाजाच्या मुलांना न्याय देत नाही. त्यामुळे आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही. आता मी इथून एकटा निघालो असलो तरी मुंबईमध्ये करोडो मराठा बांधव येतील असा इशारा त्यांनी दिला आहे.

गुलाल लागणारच

अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे. यावेळी आपण गाव सोडत असल्यानेच डोळ्यात पाणी आल्याचे म्हणताना, आता प्राण गेले तरी माघार नाही. मराठ्यांच्या अंगावर आरक्षणाचा गुलाल लागणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सरकारला झोप कशी येते?

गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाची आरक्षणासाठी मागणी आहे. त्यासाठी आक्रोश मोर्चे निघाले. शेकडो मराठे शहीद झाले. घरातील कर्ता पुरुष गेला. अनेक माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले. मात्र सरकारने आरक्षण दिले नाही. आपली मुले आत्महत्या करत असतानाही या सरकारला झोप कशी येते? हे इतके निर्दयी आणि नालायक कसे असू शकते? असा सवाल त्यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT