ST bus Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, मराठवाड्यात १२ बस फोडल्या

Swapnil Shinde

Manoj Jarange hunger strike : मराठा आरक्षणाच्या मागण्यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाचा आज ६ दिवस असून त्यांची प्रकृती खालावत असल्याने राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. गावागावात आंदोलन सुरु असून मराठवाड्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात हिंसक घटना देखील घडतायत. जालन्यातील रामनगर येथे तहसीलदाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्या. तसेच बीडच्या आष्टीत तहसीलदार यांची गाडी पेटवून देण्यात आल्याने आंदोलनाचा भडका उडाला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तापले असून, त्याचे पडसाद राज्यभरात पाहायला मिळत आहे. विविध जिल्ह्यातील शेकडो गावात मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण करण्यात येत आहे. असे असतांना काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे सुद्धा दिसत आहे. नांदेडमध्ये एसटी बस पेटवून देण्यात आली होती. तर, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळ 12 बसचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाच्यावतीने ८ जिल्ह्यातील आगारांमध्ये बस सेवा बंद करण्यात आली आहेत.

जालना तालुक्यातील बाजीउम्रद गावात मोबाईल टॉवरवर चढलेल्या आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांची गाडी आडवून त्यावर दगडफेक करण्यात आली. तर बीड जिल्ह्यातील आष्टीत तहसीलदार यांच्या घराच्या आवारातील गाडी पेटवून देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT