Animal Husbandry Business Opportunity Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry Sector : पशुसंवर्धन क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी

Animal Husbandry Business Opportunity : पशुसंवर्धनाला चालना दिल्यास त्यातून प्रक्रिया उद्योग, विक्री व्यवस्था, वैरण विकास, पशुखाद्य निर्मिती अशा अनेक क्षेत्रांत व्यवसाय व उद्योगाच्या संधी निर्माण होतात.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : पशुसंवर्धनाला चालना दिल्यास त्यातून प्रक्रिया उद्योग, विक्री व्यवस्था, वैरण विकास, पशुखाद्य निर्मिती अशा अनेक क्षेत्रांत व्यवसाय व उद्योगाच्या संधी निर्माण होतात.

त्यामुळे पशुसंवर्धनातून आपण उद्योजकता विकास घडवून लहान लहान उद्योजक घडवू शकतो. त्यातून अनेकांना रोजगाराची संधीही आपण देऊ शकतो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

पशुसंवर्धन पंधरवड्यानिमित्त मंगळवारी (ता. ६) राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुपालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मौलाना अबुल कलाम आझाद सभागृहात आयोजित या कार्यशाळेस जिल्हाभरातील पशुपालक उपस्थित होते.

कार्यक्रमास प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. प्रशांत चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी (जि.प.) डॉ. सुरेखा माने, सहायक आयुक्त डॉ. रमण इंगळे, तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. विकास नरवडे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की पशुपालनाकडे केवळ शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पाहणे उचित नाही. तर पशुपालन व संवर्धनात शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता आहे.

पशुसंवर्धनाला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक मूल्यांची जोड दिल्यास त्यातून उद्योजकता विकासाला चालना देता येईल, आपल्या जिल्ह्याला दैनंदिन जितके दूध लागते त्यापैकी निम्मेही इथे उत्पादन होत नाही. त्यासाठी शेजारील जिल्ह्यातून आपल्याला गरज भागवावी लागते. अंडी, मांस याबाबतही वेगळी स्थिती नाही. स्वाभाविकपणे दुग्ध उत्पादन, अंडी, कुक्कुटपालन, शेळी पालन या व्यवसायाला आपल्या जिल्ह्यात खूप वाव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT