Manoj Jarange-Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Manoj Jarange : आमचे आरक्षण लपवून का ठेवले ; मनोज जरांगे पाटील यांचा सवाल

Maratha Reservation : सांगली जिल्ह्यातील विटा येथील चौंडेश्वरी चौकात आरक्षणासंदर्भात शुक्रवारी (ता. १७) झालेल्या जाहीर सभेत जरांगे पाटील बोलत होते.

Team Agrowon

Sangli News : सरकारला १८०५ पासून ते १९६७ व १९६७ ते २०२३ पर्यंत जातीचे पुरावे सापडले असताना आमचे आरक्षण का लपवून ठेवले, असा सवाल मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला.

विटा येथील चौंडेश्वरी चौकात आरक्षणासंदर्भात शुक्रवारी (ता. १७) झालेल्या जाहीर सभेत जरांगे पाटील बोलत होते. ते म्हणाले, की ७० वर्षांपूर्वी मराठ्यांना आरक्षण दिले असते तर मराठ्याची जात प्रगत झाली असती. आरक्षण का दिले नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे. आरक्षणाअभावी आमच्या लेकरांच्या जागा हडप केल्या. आरक्षणाने आमच्या लेकरांचा घात केलाय. ओबीसी नेत्यांचा दबाव राज्य सरकारवर होता. आरक्षणाचे पुरावे असताना सरकारने बुडाखाली ठेवले. मराठ्यांची एकजूट बघून सरकारने पुरावे शोधण्यास सुरुवात केली. आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. ज्या नेत्यांना तुम्ही आम्ही मोठे केले, ते नेते मराठ्यांच्या बाजूने बोलायला तयार नाहीत.

१ डिसेंबरपासून गावागावात शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण सुरू झाले पाहिजे, ज्यामुळे सरकारला २४ डिसेंबरला आरक्षणाचा कायदा पारित करावा लागेल. त्यामुळे मागे हटू नका, गावे पिंजून काढा, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी उपस्थित मराठा बांधवांना केले. या वेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव सभेला उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT