Manish Sisodia Agrowon
ॲग्रो विशेष

Manish Sisodia : सिसोदिया पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात

सिसोदिया यांचा आरोपी म्हणून उल्लेख नसला तरीसुद्धा त्यांची आणि अन्य संशयितांची चौकशी सुरू आहे.

Team Agrowon

Navi Delhi : दिल्ली उत्पादन शुल्क कथित गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राज्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Deputy Chief Minister Manish Sisodia) यांना आज चौकशीसाठी पाचारण केले.

याचप्रकरणामध्ये तीन महिन्यांपूर्वी सिसोदिया यांच्याविरोधात सीबीआयकडून दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.

यामध्ये सिसोदिया यांचा आरोपी म्हणून उल्लेख नसला तरीसुद्धा त्यांची आणि अन्य संशयितांची चौकशी सुरू आहे. मागील वर्षी १७ ऑक्टोबर रोजी त्यांची चौकशी करण्यात आली होती तसेच त्यांच्या घरातील आणि बँकेमधील तिजोरीची झाडाझडती घेण्यात आली होती.

‘दिल्ली उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२’ ची अंमलबजावणी आणि त्यातील आर्थिक हेराफेरीची तपास संस्थांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये सिसोदिया यांनी म्हटले आहे की, ‘‘ सीबीआयने मला पुन्हा एकदा उद्या चौकशीसाठी बोलाविले असून ते माझ्याविरोधात सीबीआय आणि ईडीची पूर्ण ताकद वापरत आहेत.

त्यांनी माझ्या घराची, बँक लॉकरची झाडाझडती घेतली होती पण त्यांना त्यात काहीही आढळून आले नव्हते. दिल्लीमध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मी चांगले काम करतो आहे. ते मला यापासून रोखू इच्छितात. याआधी देखील मी चौकशीला पूर्ण सहकार्य केले होते. भविष्यामध्ये देखील करत राहील.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT