Mango Crop Protection Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Protection : आंब्याच्या फळाला कागदी पिशवीचा आधार

Mango Farming : गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या ढगाळ वातावरणामुळे डहाणू, तलासरीतील आंबा बागायतदार संकटात सापडला आहे.

Team Agrowon

Palghar News : हवामानातील बदलाची समस्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भेडसावते. त्याचा पीक उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या ढगाळ वातावरणामुळे डहाणू, तलासरीतील आंबा बागायतदार संकटात सापडला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन घटनेची शक्यता आहे, असे शेतकरी वर्गात वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे आंबा बागायतदार कागदी पिशव्यांचा वापर करून ऊन, वाऱ्यापासून फळाचे संरक्षण करीत आहेत. पालघर जिल्ह्यात उष्णतेचे वारे वाहू लागले आहे. मागील काही दिवसांत ऋतुमानात बदल झाल्याने दिवसा उष्ण तापमान आणि पहाटेच्या वेळेला थंडी असे विषम हवामान तयार झाले होते.

परिणामी, फळे गळणे, रोगराईची समस्या प्रामुख्याने जाणवू लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनाचा फटका बसून आंब्याचे उत्पादन घटणार असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीची भीती आहे.

प्रति पिशवी रुपयाचा खर्च

साधी कागदी पिशव्या या अतिशय स्वस्त दरात बाजारात उपलब्ध आहेत. प्रति पिशवी एक रुपया या दराने बाजारात उपलब्ध आहेत. उच्च प्रतीच्या पिशव्या वापरल्यास पुनर्वापर करता येऊ शकतो. फळ अंडाकृती आकाराचे असताना २५ बाय २० सेंमी आकाराची कागदी पिशवी वापरणे गरजेचे आहे.

पालघर जिल्ह्यात मेच्या शेवटपासून जूनच्या पहिल्या आठवड्यात आंबा विक्रीसाठी तयार होतो. मेमध्ये प्रचंड उष्णता असल्याने आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. फळांचे उष्णतेपासून संरक्षण होण्यासाठी कागदी पिशव्यांचा वापर याच कालावधीत करणे फायदेशीर ठरेल.
- सुदीप म्हात्रे, आंबा उत्पादक शेतकरी, बोरीगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT