Mango Farming : वातावरणामुळे ‘रायवळ’उत्पादनात घट

Raywal Mango : मुरबाड तालुक्यातील प्रत्येक शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर, रान माळावर सकाळीची न्याहारी आंब्याच्या झाडाखाली बसून खात असत.
Mango Farming
Mango Farming Agrowon
Published on
Updated on

Palghar News : तालुका भातासाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथील रायवळ आंबेही विशेष प्रसिद्ध आहेत. गेली दोन-तीन वर्षे पर्यावरण बदलामुळे आंब्याचा मोहोर करपत आहे. चोखून खाल्ला जाणारा रायवळ आता मिळणे दुर्मिळ होणार आहे. पूर्वीपेक्षा तालुक्यात या गावठी आंब्याची संख्या घटली आहे. उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

मुरबाड तालुक्यातील प्रत्येक शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर, रान माळावर सकाळीची न्याहारी आंब्याच्या झाडाखाली बसून खात असत. लहान मुले सुट्टीत कैऱ्या खाण्याचा आनंद हमखास घेतात. आज हापूस आणि कलमी आंब्याची लागवड करण्याकडे ‌सर्वांचा कल आहे. मात्र, रायवळ आंबा संवर्धनासाठी कोणत्याही रासायनिक खताची, कीटकनाशकाची गरज पडत नाही.

Mango Farming
Kokan Mango Transport : आंबा वाहतुकीस वाहतूक पोलिसांचा त्रास कमी करा

मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी; तसेच पर्यावरण संतुलनासाठी देशी आंबा खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. कितीही वादळवारा आला, तरी त्यांना तोंड देण्याची क्षमता या आंब्यामध्ये असते. मुरबाडमधील अनेक गावांत काही ठराविक गावठी आंबे सुप्रसिद्ध आहेत. खोबऱ्या साखऱ्या, रातांब्या घोट्या अशा नावाने त्यांची ओळख आहे. गुजराती, मारवाडीबांधव खासकरून या आंब्यांची मागणी करताना दिसतात.

Mango Farming
Hapus Mango Rate : हापूसच्या ६४ हजार पेट्यांची आवक

आज संपूर्ण मुरबाड तालुक्यात वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रानमाळावर आपोआप उगवली जाणारी आंब्याची रोपटी भस्मसात होतात. त्यामुळे कुठेही करवंदीच्या जाळीत वाढणारी ही वनसंपदा संपुष्टात येत आहे.

कृषी विभाग, वन विभागाने प्रत्येक गावाच्या हद्दीत पाहणी करून या झाडांची नोंदणी करणे आणि त्यांची तोड होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. ठराविक दर्जेदार वाणांच्या बियांपासून रोपे बनवून ती हापूसप्रमाणे लागवड केली पाहिजे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. स्थानिक बाजारपेठेत या आंब्याला योग्य भाव मिळण्यासाठी सरकार स्तरावर कोणताही प्रयत्न होत नाही, अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

विषमुक्त गावठी आंब्याला चांगली बाजारपेठ मिळाली, तर रोजगाराचे साधन म्हणून शेतीपूरक व्यवसाय सुरू होईल. या गावठी आंब्याच्या संवर्धनासाठी जनजागृतीची मोहीम हाती घेतली पाहिजे.
- प्रकाश पवार, शेतकरी, माजी चेअरमन, खरेदी-विक्री संघ मुरबाड तालुका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com