Mango Season Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Season : सिंधुदुर्गच्या काही भागांत आंबा हंगामाला पूर्णविराम

Mango Kanning : उरलासुरला आंबा कॅनिंगला; कमी आंबा उपलब्ध

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Mango Production : सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पडत असलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे जिल्ह्याच्या काही भागांतील आंबा हंगामाला पूर्णविराम मिळाला असून, किनारपट्टीच्या तालुक्यातील आंबा हंगामदेखील अंतिम टप्प्यात आहे.
जिल्ह्यात या वर्षी किनारपट्टी भागात मार्चपासून आंबा हंगाम सुरू झाला. परंतु नियमित हंगाम हा एप्रिलपासून सुरू झाला. पहिल्या टप्प्यात अतिशय कमी प्रमाणात आंबा बाजारपेठेत दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात उत्पादन मोठ्या प्रमाणात आले.

या वर्षी फुलकिडींच्या प्रादुर्भावाने आंबा बागायतदार मेटाकुटीला आले. फुलकिडीपुढे विद्यापीठाने शिफारस केलेली कीटकनाशके निष्प्रभ ठरली. मात्र बागायतदारांनी विविध उपाययोजना करीत आंबा उत्पादन घेतले. किनारपट्टीच्या देवगड, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यांत आंब्याचे चांगले उत्पादन आले. परंतु कुडाळ, कणकवली, सावंतवाडी आणि वैभववाडी तालुक्यांतील पूर्वपट्ट्यात आंबा हंगाम मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाला.

आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वी पूर्वमोसमी पावसाचा तडाखा या भागाला बसला आणि या भागातील आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात आला. जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यातील आंबा हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे. परंतु देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या भागांत अजूनही आंबा हंगाम सुरू आहे. या तालुक्यांमध्ये एक, दोन वेळा पाऊस झाला. परंतु झाडांवर मोठ्या प्रमाणात आंबा शिल्लक आहे. त्यामुळे या भागातील आंबा आता कॅनिंगला जात आहे. पुढील आठ दिवसांत या भागातील आंबा हंगामदेखील संपण्याची शक्यता आहे. सध्या कॅनिंगच्या आंब्याला देखील प्रतिकिलो ४५ रुपये दर मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Winter Session 2025: 'मनरेगा'तून महात्मा गांधींचं नाव का हटवलं?; 'व्हीबी- जी राम जी' विधेयकावरून प्रियांका गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Chia Seed Farming: हरभऱ्याला पर्याय चिया सीड्स !

Sheep Deaths: विषबाधा झाल्याने ७० मेंढ्या दगावल्या

Farmer Tour: वाशीममधील शेतकरी आंतरराज्यीय अभ्यासदौऱ्यावर

Farmer Loan : सावकारी कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी; चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT